Home | National | Haryana | A Lady Commit Suicide By Jumping In The Canal With 6 Years Old Daughter

६ वर्षांच्या मुलीला कमरेला बांधून शिक्षिकेने कॅनॉलमध्ये मारली उडी, हे होते कारण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 23, 2017, 03:51 PM IST

रेवाडी (हरियाणा)- येथील सेक्टर-३ मधील रहिवासी लेडी टिचरने ६ वर्षांच्या मुलीला कमरेला बांधून कॅनॉलमध्ये उडी घेऊन आत्महत्य

 • A Lady Commit Suicide By Jumping In The Canal With 6 Years Old Daughter
  रेवाडी (हरियाणा)- येथील सेक्टर-३ मधील रहिवासी लेडी टिचरने ६ वर्षांच्या मुलीला कमरेला बांधून कॅनॉलमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी पाणबुड्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. तिच्या वडीलांनी तिचा नवरा आणि सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नवरा तिला मारहाण करायचा आणि आत्महत्येला प्रवृत्त करायचा असा आरोप तिच्या वडीलांनी केला आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून चौकशी सुरु केली आहे.
  सकाळी निघाली घरुन, सायंकाळी दिसले मृतदेह
  - सेक्टर-३ मध्ये राहणारी ३० वर्षीय सरिता प्रायव्हेट शाळेत शिक्षिका होती. तिचे लग्न ८ वर्षांपूर्वी अनुभव नावाच्या तरुणासोबत झाले होते.
  - घटनास्थळी पोहोचल्यानंतर माहेरच्या मंडळीने आरोप केला, की अनुभव प्रचंड दारु घ्यायचा. दारु घेऊन आला की तो प्रचंड भांडण करायचा. तसेच माहेरातून पैसे आणण्यासाठी दबाव टाकायचा.
  - बुधवारी सकाळीच सरिया घरुन निघाली होती. तिने मुलीलाही सोबत घेतले होते. बराच वेळ झाला तरी ती घरी आली नाही. त्यानंतर तिचा शोध घेण्यात आला. या दरम्यान दोघींचे मृतदेह जवाहर लाल नेहरु कॅनॉलमध्ये आढळून आले.
  - पोलिसांनी मृतदेह काढण्यासाठी पाणबुड्यांना बोलवले. त्यांच्या मदतीने पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आले.
  पुढील स्लाईडवर बघा, या घटनेशी संबंधित फोटो....

Trending