आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

60 वर्षांत चार वेळा या गावाची झाली राखरांगोळी, मुली लग्नाला देतात नकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाला- उत्तर प्रदेशच्या सीमेवर असलेले हरियाणाचे गाव पौबारी याची गेल्या 60 वर्षांमध्ये तब्बल चार वेळा राखरांगोळी झाली आहे. 700 लोकसंख्या असलेल्या या गावात पायाभुत सुविधांची प्रचंड वानवा आहे. अनेक कुटुंब येथून स्थलांतरीत झाले आहेत. आता तर या गावातील तरुणांना बाहेरच्या गावातील कुटुंब लग्नासाठी मुली देत नाहीत.
कसे आहे हे गाव
- या गावातील तरुणांना इतर गावातील तरुणी लग्नासाठी दिल्या जात नाहीत. त्यामुळे या गावातील बहुतांश तरुण अविवाहित आहेत.
- या गावात पायाभुत सुविधा नाहीत. रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदी सुविधांची कमतरता आहे.
- शाळेत वर्ग घेता येतील अशा खोल्याही नाहीत. गल्ल्यांमध्ये कच्चे रस्ते नाही. बहुतांश ग्रामस्थ अशिक्षित आहेत.
- गावात डॉक्टर नाही. कोणत्याही घरी गॅस कनेक्शन नाही.
मतदानासाठी जावे लागते पाच किलोमीटर दूर
या गावात एकूण 382 मतदाते आहेत. गावात पोलिंग बुथ नाही. मतदानासाठी पाच किलोमीटर पायपिट करुन जावे लागते. यादरम्यान यमुना नदीही पार करावी लागते. नदीचे पाणी वाढले तर 35 किलोमीटर दूर जाऊन मदतान करावे लागते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या गावाचे काही फोटो....
बातम्या आणखी आहेत...