आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश अंबानीच्या एका खिशात मोदी तर दुसऱ्यात राहुल, केजरीवाल यांचा सडकून प्रहार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतग (हरियाणा)- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचार सभांचा खर्च उद्योगपती मुकेश अंबानी उचलतात. त्यांना हेलिकॉफ्टर पुरवतात. अंबानीच्या एका खिशात मोदी तर दुसऱ्या खिशात राहुल गांधी आहेत, असा जोरदार प्रहार आम आदमी पक्षाचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
मोदींना लक्ष्य करताना केजरीवाल म्हणाले, की नरेंद्र मोदी यांना हेलिकॉफ्टर कोण पुरवतो? अंबानी यांनी दिलेल्या हेलिकॉफ्टरच्या शेजारी मोदी उभे असल्याचे माझ्याजवळ छायाचित्र आहे. मोदी म्हणतात ते चहा विकणारे होते. एखाद्या चहा विकणाऱ्याकडे एवढे हेलिकॉप्टर कसे काय राहू शकतात. मी अंबानींच्या स्विस बॅंक अकाऊंटचे क्रमांक जाहीर केले आहेत. नरेंद्र मोदी काळा पैसा भारतात आणण्याच्या बाता मारतात. अंबानी यांच्या खात्यातून ते पैसे परत आणतील का?
केजरीवाल म्हणाले, की हरियाणाचे मुख्यमंत्री हुड्डा प्रॉपर्टी डिलर आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून रॉबर्ट वढेरा, डिएलएफ, रिलायंस या कंपन्यांना दिल्या जात आहेत. मुकेश अंबानीला केंद्र सरकार प्रतिवर्ष 54 हजार कोटी रुपये देत आहे. त्याचे कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही. मोदी किंवा राहुल कुणीही सत्तेवर आले तरी अंबानीच देश चालविणार आहेत.
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची ही पहिलीच प्रचार सभा आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांचा बिगून या सभेतून वाजणार आहे. आम आदमी पक्ष हरियाणात लोकसभेच्या 10 तर विधानसभेच्या 90 जागा लढविणार आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या सभेला झालेली गर्दी बघा पुढील स्लाईडवर...