आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhim Donner A Buffalo Cost Is More Then Helicopter

हेलिकॉप्टरपेक्षा महाग आहे \'भीम डोनर\', वर्षाला कमावतो २५ लाख रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: भीम डोनर आणि मालक करमवीर सिंह)

लुधियाना - तीन वर्षाचा या 'भीम डोनर' रेड्याची किंमत दहा कोटीपर्यंत लागली आहे. मात्र एवढी किंमत मिळाल्यानंतरही याचे मालक करमवीर सिंह याला विकण्यास तयार नाही. 1200 किलो वजनाचा हा मुर्राह जातीचा रेडा दररोज 4 मिली. ते 5 मिली. पर्यंत उच्चदर्जाचे सीमन निर्माण करू शकतो. एवढ्या सीमनने जवळपास 200-250 म्हशींची ब्रीडींग होऊ शकते. यापूर्वी या भीम रेड्याचा मोठा भाऊ 6 वर्षाचा ‘युवी डोनर’ ची 7 कोटी रुपयांची बोली लागली होती. मुर्राह जातीचे हे दोन्ही 'भीम' आणि 'युवी' रेडे कर्नाळ येथील सुनारियो गावातील मालक करमवीर सिंह यांच्यासोबत जगराओमधील पीडीएफएने आयोजित केलेल्या तीन दिवसीय जत्रेत भाग घेण्यासाठी पोहोचले आहेत.

भीम कमावतो वर्षाला 25 लाख रुपये
मुर्राह जातीचा ‘भीम’ करमवीर सिंह कमाईच्या बाबतीत सर्वांनाच मागे टाकतो. एकट्या ‘भीम’ची त्याच्या सीमनमुळेच वर्षाला जवळपास 25 लाख रुपयांची कमाई होते. तर, दररोज 2000 रुपयांचे त्याला खायला लागते. या सीमनच्या एका वॉल्यूमची किंमत 300-500 रुपये आहे. याशीवाय भीमचा मोठा भाऊ ‘युवी डोनर’ आणि त्याचे वडील युगराज यांच्या सीमनमुळे दरवर्षी 45 लाख रुपयांपर्यंत कमाई होते. एवढेच नाही तर भीमची आई गंगा हिच्या नावावरही 26.4 लीटर दूध देण्याचा विक्रम आहे. हा विक्रम मुर्राह जातीच्या कोणत्याही म्हशीपेक्षा जास्त आहे.

पुढील स्लाईडवर वाचा,22 देशातून मिळाले आहे भीम आणि युवीला आमंत्रण...