दैनिक भास्कर रोहतकचे संपादक श्रीवास्तवांचे निधन
दिव्य मराठी वेब टीम | Update - May 21, 2017, 02:20 AM IST
दैनिक भास्कर, रोहतकचे संपादक जितेंद्र श्रीवास्तव यांचे शनिवारी सकाळी आकस्मिक निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. शनिवारी सकाळी ते रोहतक रेल्वेस्थानकावर गेले होते. अचानक ट्रेनखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
-
रोहतक - दैनिक भास्कर, रोहतकचे संपादक जितेंद्र श्रीवास्तव यांचे शनिवारी सकाळी आकस्मिक निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. शनिवारी सकाळी ते रोहतक रेल्वेस्थानकावर गेले होते. अचानक ट्रेनखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. ते मूळचे अलाहाबादचे होते. जितेंद्र श्रीवास्तव यांनी विविध राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये महत्त्वाच्या पदांवर १८ वर्षे काम केले होते. २००६ मध्ये ते दैनिक भास्कर वृत्तपत्र समूहात रुजू झाले. त्यांच्या अकस्मात निधनाबद्दल हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह अनेक मंत्र्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी दु:ख व्यक्त केले.