आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dalit Community Blocked Traffic At Ambedkar Chowk.

हरियाणामध्ये डॉ. बाबासाहेबांच्‍या पुतळ्याची विटंबना, सोशल मीडियावर संताप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाडवा (कुरुक्षेत्र) - लाडवा शहरातील डॉ. आंबेडकर चौकात असलेल्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुतळ्याची समाजकंटकांनी शुक्रवारी रात्री विटंबना केली. शनिवारी सकाळी विविध संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन केले. सकाळी 11 वाजता लोकांनी रस्‍ता रोखून धरला होता. सुमारे आठ तास लोक रस्‍त्यावर उतरले होते. पोलिस प्रशासन आणि स्‍थानिक आमदारांनी कारवाईचे आश्‍वासन दिल्‍यानंतर लोकांनी हा बंद मागे घेतला.
सध्‍या सोशल मीडियावर या घटनेचे फोटो मोठ्या प्रमाणात व्‍हायरल होत असून, सर्व स्‍तरातून संताप व्‍यक्‍त केला जात आहे. लाडवामध्‍ये बाबासाहेबांच्‍या पुतळ्याची पुन्‍हा स्‍थापना करण्‍यात यावी अशी मागणी काही संघटनांनी केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभेचे आंदोलन...
- पुतळ्याचे विटंबन झाल्‍यांनतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभेच्‍या कार्यकर्त्‍यांनी आंबेडकर चौकात आंदोलन केले.
- या आंदोलनामुळे कुरुक्षेत्र-यमुनानगर हायवेवरील दुहेरी वाहतूक बंद होती.
- सायंकाळी 6 वाजता कार्यकर्त्‍यांनी आंदोलन मागे घेतले.
- डॉ. आंबेडकर सभेचे रतनलाल बनवाल यांनी आंदोलनाचे नेतृत्‍व केले.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुतळ्याचे फोटो...