हिसार- हरियाणाच्या फतेहाबादमध्ये आरोग्यमंत्री अनिल विज आणि पोलिस आयुक्त संगीता कालिया यांच्यात काल (शुक्रवार) कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर विज यांनी संगीता यांना मिटिंग सोडून जाण्याचा आदेश दिला. त्यावर संगीता यांनी घेतलेली मिटिंग न सोडण्याची कडक भूमिका चर्चेचा विषय ठरली. अगदी सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या संगीता यांनी मंत्र्याला चांगलाच धडा शिकवला. संगीता यांचे वडील हरियाणा पोलिस ठाण्यात साधे पेंटर म्हणून काम करीत होते. त्याच ठाण्यात संगीता डीएसपी म्हणून गेल्या होत्या. जाणून घ्या संगीता यांची रोचक कहाणी.
फतेहाबादमध्ये आहे वेगळी ओळख
पोलिस आयुक्त संगीता कालिया फतेहाबादमध्ये गेल्या 9 महिन्यांपासून ड्युटी करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक आव्हानात्मक प्रकरणे सोडविली आहेत. त्यांच्यासमोर आलेली कोणतीही केस सोडविल्याशिवाय राहत नाही असे सांगितले जाते. पोलिस आयुक्त म्हणून त्यांची एक वेगळी ओळख या परिसरात आहे. सामाजिक कार्यांमध्येही त्या व्यस्त असतात.
प्रामाणिक पोलिस अधिकारी
संगीता 2010 च्या बॅचच्या आयपीएस आहेत. त्या मुळच्या भिवानी जिल्ह्यातील आहेत. त्यांचे शिक्षण याच जिल्ह्यात झाले. त्यांचे वडील एक साधे पेंटर होते. घरची परिस्थिती बेताचीच होती. तरीही परिस्थितीवर मात करीत संगीता आयपीएस अधिकारी झाल्या.
तिसऱ्या संधीचे केले सोने
2005 मध्ये संगीता यांनी सिव्हिल सर्व्हिसेसची परिक्षा दिली होती. पण त्यांना यश मिळाले नाही. दुसऱ्यांदा त्यांनी पुन्हा प्रयत्न केला. पण त्यांना रेल्वे विभागात नोकरी लागली. पण त्यांना रेल्वेत नोकरी करायची नव्हती. पुन्हा त्यांनी कसून प्रयत्न केला. त्यानंतर त्यांची आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली. त्यांना लिटरेचर आणि म्युझिकची आवड आहे. दररोज त्या 15 तास काम करतात.
पुढील स्लाईडवर बघा, संगीता कालिया यांचे इतर फोटो... तरुणींना देतात आत्मरक्षणाचे धडे... असे करतात सामाजिक कार्य...