रोहतक- दोन बहिणींना झालेल्या छेडछाडीचा निषेध करण्यासाठी बुधवारी विद्यार्थ्यांनी विशाल रॅली काढली होती. एसडीएम यांना निवेदन देऊन सगळे परत येत होते. यावेळी एका युवकाने एका युवतीची छेड काढली. त्यानंतर संतप्त युवतीने युवकाच्या श्रीमुखात भडकावली. त्याला चांगलाच चोप दिला. या घटनेने भांबावलेल्या युवकाने अखेर तिची माफी मागितली. यावेळी बोलताना युवती म्हणाली, की
आपला समाज पुरुषप्रधान आहे. पोलिस केस केली तर मुलीचीच बदनामी होते. त्यामुळे मी माझ्या भाषेत त्याला उत्तर दिले.