आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Haryana Body Builder Praveen Nandal Takes Heavy Diet Daily

दिवसभरात 4 लीटर दुध आणि 30 अंडी खातो हा बॉडी बिल्डर, घेतो 8 तास मेहनत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानीपत (हरियाणा)- महाराना येथील बॉडी बिल्डर प्रवीण नांदल याची निवड हॉंगकॉंगमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. 23 ते 26 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.
प्रवीणचे प्रशिक्षक सुनील बिंझौल यांनी सांगितले, की हॉंगकॉंगमधील बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भाग घेणारा तो हरियाणाचा एकमेव बॉडी बिल्डर आहे. अवघ्या 17 वर्षांचा असताना त्याने बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भाग घ्यायला सुरवात केली. कुरुक्षेत्र विद्यापिठाच्या ओव्हरऑल चॅम्पिअनशिपमध्ये तो तीन वेळा विजयी राहिला आहे.
प्रवीणने नॉर्थ इंडिया स्पर्धेत गोल्ड, 2012 मध्ये रशियात झालेल्या स्पर्धेत गोल्ड जिंकले आहे. 2013 मध्ये युक्रेनमध्ये आयोजित केलेल्या युरोप बॉडी बिल्डिंग स्पर्धेत गोल्ड आणि 2014 मध्ये मुंबईत झालेल्या मिस्टर वर्ल्ड चॅम्पिअनशिपमध्ये टॉप 5 मध्ये आला होता.
प्रवीण दररोज डायटमध्ये 30 अंडी, 4 लीटर दुध, एक डझन केळी, वरण आणि हिरव्या पालेभाज्या खातो. रोज सुमारे 8 तास कठोर मेहनत घेतो. सध्या तो नवोदित बॉडी बिल्डिर्सनाही प्रशिक्षण देतो.
पुढील स्लाईडवर बघा, प्रवीण नांदल याच्या पिळदार शरीरयष्टीचे आकर्षक फोटो....