Home | National | Haryana | Interesting Facts About Mughal Emperor Akbar

INTERESTING: गुरुलाच कैदी बनविणा-या 'अकबर बादशाहाच्‍या' खास 10 गोष्‍टी

दिव्‍य मराठी नेटवर्क | Update - Jan 22, 2014, 10:57 AM IST

14 जानेवारी 1761 मध्‍ये पानीपत येथे झालेल्‍या घनघोर युद्धात मुघलांनी विजय प्राप्‍त केला होता. तेव्हा मुघल बादशाहा होता अकबर. या पॅकेजच्‍या माध्‍यमातून आम्‍ही तुम्‍हाला जलालुद्दीन मोहम्‍मद अकबर विषयीच्‍या काही खास गोष्‍टी सांगणार आहोत.

 • Interesting Facts About Mughal Emperor Akbar

  अकबर बादशाहाचे सैन्‍य प्रबळ असले तरीही सत्‍ता मात्र बेरम खानच्‍या अखत्‍यारीत होती. अकबर फक्‍त 'नाममात्र सम्राट' असल्‍यासारखा होता. त्‍यामुळे राजा अक‍बर समाधानी नव्‍हता. बेरम खानपासून सुटका करण्‍यासाठी तो दिल्‍ली येथे गेला. काही कालावधीनंतर त्‍याने बेरम खानसोबत युध्‍द पुकारले. बेरम खानला कैदी बनविले. त्‍यानंतर काही काळाने त्‍याला माफ करुन मक्‍काला जाण्‍याची परवानगी दिली.

  पुढील स्‍लाइडवर वाचा, अकबराविषयीच्‍या 10 रंजक गोष्‍टी...

 • Interesting Facts About Mughal Emperor Akbar

  अकबर बनला तिसरा मुघल बादशाहा

  भारताच्‍या इतिहासातील एक प्रसिध्‍द बादशाहा म्‍हणून अकबराला ओळखल्‍या जाते. अकबर तिसरा मुघल बादशाहा होता. अकबराला त्‍याच्‍या उदारवृत्‍तीमुळे 'शहेनशहा-ए-आझम' म्‍हटले जायचे. अकबराचा जन्‍म 15 ऑक्‍टोबर 1556 रोजी झाला. पिता हिमायुंच्‍या मृत्‍युमुळे वयाच्‍या 13 व्‍या वर्षीच अकबर सिंहासनावर बसला. अकबराने पहिले युध्‍द पंजाबच्‍या सिंकदरशाह पुरी येथे केले.

 • Interesting Facts About Mughal Emperor Akbar
  अकबराचा जन्‍म बादशाही घराण्‍यात झाला. त्‍याचे वडील मुघल बादशाहा होते. त्‍याच्‍या आईचे नाव हमीदा बानो बेगम होते. त्‍याच्‍या वडीलांनी त्‍याचे नाव जलालउद्दीन मोहम्‍मद ठेवले होते. अकबर तीन वर्षाचा असतानाच त्‍याला आई- वडिलांपासून दूर राहावे लागले. अकबराचे लालन-पालन त्‍याचे काका कामरान यांनी काबुल येथील किल्‍ल्‍यावर केले. अकबरला लहानपणापासून घोडदौड, शस्‍त्र चालविणे, युध्‍दकला अशा विषयात आवड होती.
 • Interesting Facts About Mughal Emperor Akbar

  लहानपणीच बनला शहेनशाहा
  वडील हिमायुंच्‍या निधनामुळे अकबर लहानपणीच शहेनशाहा बनला. त्‍यावेळी त्‍याचे वय अवघे तेरा वर्षे होते. त्‍याचे गुरु बेरम खान यांच्‍या मदतीने अकबर राजनैतिक गोष्‍टी शिकला.

 • Interesting Facts About Mughal Emperor Akbar

  अकबर बादशाहा झाल्‍यानंतर हिंदु सम्राट हेमुने मुघलांना पराभूत केले होते. परंतु बेरम खानच्‍या मदतीने अकबराने पानीपतची दुसरी लढाई जिंकली.

 • Interesting Facts About Mughal Emperor Akbar

  अकबराने वयाच्‍या 18 व्‍या वर्षी सत्‍ता मिळविली. परंतु सत्‍तेवर बेरमचे (अकबराचे गुरु) वर्चस्‍व होते. बेरमचे वर्चस्‍व मोडून काढत अकबराने त्‍याला बंदी बनविले. सत्‍तेची सुत्रे आपल्‍या हाती घेतली.

 • Interesting Facts About Mughal Emperor Akbar
  इतर धर्मांप्रती उदार वृत्‍ती
  अकबराने इतर धर्मांप्रती उदार वृत्‍ती ठेवली. त्‍यामुळे त्‍याला इतर राज्‍यांमध्‍येही विजय मिळविता आला. आपल्‍या वृत्‍तीमुळे अकबराला इतर राज्‍य सहजगत्‍या जिंकता आली.
 • Interesting Facts About Mughal Emperor Akbar

  अकबराचा मुलगा सलीम दरबारातील एका सौंदर्यवान नर्तकी 'अनारकली'सोबत प्रेम करायला लागला. अनारकलीच्‍या प्रेमात वेडा झालेला सलीम त्‍याच्‍या पित्‍याशी म्‍हणजेच मुघल बादशाहा अकबराशी युध्‍दासाठी तयार झाला. अकबराला मुलाचे हे प्रेम अजिबात आवडले नव्‍हते. युध्‍दामध्‍ये सलीमचा पराभव झाला. सलीमच्‍या समोरच अनारकलीला भिंतीमध्‍ये जिवंत गाडण्‍यात आले होते.

 • Interesting Facts About Mughal Emperor Akbar

  निरक्षर असूनही अकबराचे कलावंतांवर आणि बुध्दिजीवी लोकांवर विशेष प्रेम होते. त्‍याच्‍या या प्रेमापोटीच त्‍याने अत्‍यंत गुणवान लोक आपल्‍या दरबारी ठेवले होते. त्‍याच्‍या मंत्रीमंडळात अब्‍दुल रहीम, अब्‍दुल फैजल, बीरबल, फैजी, हमीम हूमन, राजा मान सिंह, शेख मुबारक, तानसेन, तोडल मल ही नवरत्‍न होते.

 • Interesting Facts About Mughal Emperor Akbar

  अकबराच्‍या काळात बनविलेले मकबरे
  आग्रा फोर्ट (1565), लाहोर पॅलेस (1572), फतेहपुर सिक्री, बुलंद दरवाजा आणि अलाहाबादचा किल्‍ला (1583) यांचे बांधाकाम करण्यात आले.

Trending