आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

27 दिवसांपूर्वी आली होती सासरी, पहिल्याच संधीत निवडणूक लढून झाली सरपंच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक (हरियाणा)- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हरियाणात पहिल्यांदाच शिक्षित नेत्यांची पंचायत उदयाला आली आहे. यासाठी येथील राजकीय कुटुंबांना प्रचंड जोडतोड करावी लागली. रोहतक जिल्ह्यातील गांधरा गावातील एका कुटुंबाने तर हद्दच केली. या कुटुंबातील एकमेव वयोवृद्ध महिला केवळ पाचवी पास होती. त्यामुळे निवडणुकीच्या 27 दिवसांपूर्वी घरी सून आणण्यात आली. त्यासाठी केवळ कोर्ट मॅरेजचे सोपस्कर पार पाडण्यात आले. आता ही नवविवाहित सून रजनी मलिक चक्क सरपंच झाली आहे.
एमएससी, बीएड आणि नेट पास आहे सूनबाई
- मलिक कुटुंबातील मुलगा आणि दिल्ली पोलिसात हवालदार असलेल्या मोनूने निवडणुकीच्या केवळ 27 दिवसांपूर्वी लग्न केले. त्याची पत्नी रजनी एमएससी, बीएड असून नेट पास झाली आहे.
- 26 डिसेंबर रोजी रजनीने सरपंचपदासाठी अर्ज दाखल केला. ती रविवारी निवडणूक जिंकली.
- रजनीची सासू पाचवी पाच आहे. त्यामुळे लग्नाच्या आधीच रजनीला सांगितले होते, की तिला सरपंच व्हावे लागणार आहे.
- रजनीच्या हाताची मेंदीही अजून गेलेली नाही. आता सासरप्रमाणेच गावाच्या विकासासाठी काम करणार असल्याचे ती सांगते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, रजनीच्या गावात घुंगट प्रथा आहे... तिही घुंगट घेऊन अशी काम करते....