आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Terrorist Attack On Pathankot Indian Airforce Base

पठाणकोट हल्ला: या कमांडोच्या पोटात गेल्या 6 गोळ्या तरी लढला 1 तास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाला- पठाणकोट एअरफोर्स स्टेशनमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी गरुड कमांडो फोर्सने सर्च ऑपरेशन राबविले होते. यावेळी या टीममधील कमांडो शैलभ गौड याची नजर झुडपात लपलेल्या दहशतवाद्यांवर पडली. त्याने लगेच गोळीबार सुरु केला. दहशतवाद्यांनीही जोरदार गोळीबार केला. या दरम्यान शैलभ याच्या पोटात सहा गोळ्या गेल्या. त्यानंतरही तो तब्बल तासभर दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत होता.
मॉडेलिंगचा आहे छंद
शैलभचा मोठा भाऊ वैभव याने सांगितले, की त्याला मॉडेलिंगचा छंद आहे. शाळा आणि कॉलेजमध्ये असताना तो मॉडेलिंग करायचा. पण सोबतचा त्याला देश सेवाही करायची होती. त्यामुळे तो लष्करात आला.
एक शहिद तर दुसऱ्यावर उपचार
हरियाणाच्या गरनाला येथील रहिवासी आणि गरुड कमांडो फोर्सचे गुरसेवकसिंग दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. शैलभ गंभीर जखमी झाला असून पठाणकोटमधील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, शैलभ याचे मॉडेलिंगचे फोटो... असे रुग्णालयात सुरु आहेत उपचार...