आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi Rally In Panipat Haryana For Beti Bachav Beti Padhao

नरेंद्र मोदींनी पानिपत जिंकले, उसळली अलोट गर्दी, बघा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानिपत (हरियाणा)- 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या अभियानाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पानिपतला भेट दिली. यावेळी त्यांना बघण्यासाठी, ऐकण्यासाठी लाखो लोकांनी गर्दी केली. सध्या हरियाणात प्रचंड थंडी आहे. तरीही मोदींची एक झलक घेण्यासाठी अबालवृद्ध जमले होते. या दरम्यान, निसर्गाची अवकृपा झाली. पाऊस सुरु झाला. त्यानंतर काहींनी छत्र्या उघडल्या तर काहींनी पॉम्पलेटचाच आधार घेतला. पण गर्दी काही कमी झाली नाही.
सिनेअभिनेत्री माधुरी दीक्षितला 'बेटी बचाओ बेटी पढाओ' अभियानाचे ब्रॅंड अॅम्बॅसिडर करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह माधुरी दीक्षित, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर व्यासपिठावर होते. खट्टर यांनी मुलींच्या शिक्षणासाठी सहा महत्त्वपूर्ण पावले उचलण्याचे नागरिकांना आवाहन केले. नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरवात करताच एकच जल्लोष झाला. नागरिक आपल्या जागी उभे झाले. त्यानंतर मोदींच्या भाषणात टाळ्या कोसळत राहिल्या. मोदींनी मुलींचे आपल्या समाजातील महत्त्व पटवून दिले.
पुढील स्लाईडवर बघा, नरेंद्र मोदी यांना बघण्यासाठी, ऐकण्यासाठी असा जमला जनसमुदाय... मोठ्या संख्येने मुली होत्या उपस्थित...