Home | National | Haryana | Ram Rahim gets 10 yrs punishment, read chronology of events

बलात्कारी राम रहिम सिंगला 10 वर्षांची शिक्षा, जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 28, 2017, 05:25 PM IST

दोन महिला अनुयायींवरील बलात्कार प्रकरणात गुरमीत राम रहीम सिंग याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे

 • Ram Rahim gets 10 yrs punishment, read chronology of events
  रोहतक/सिरसा- दोन महिला साध्वींवरील बलात्कार प्रकरणात डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच 65 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शिक्षा झाल्यानंतर कोर्टाच्या खोलीतच राम रहिम जमिनीवर बसला असे सुत्रांनी सांगितले आहे. या पूर्श्वभूमिवर जाणून घेऊयात या संपूर्ण घटनेचा क्रम.
  असा आहे संंपूर्ण घटनाक्रम
  2017 : दोन साध्वींवर बलात्कार केल्या प्रकरणी बाबा राम रहीम सिंग याला 10 वर्षांची शिक्षा सीबीआय कोर्टाच्या न्यायाधिशांनी सुनावली आहे. यासोबतच 65 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
  2017 : बाबा राम रहीम सिंगला दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर त्याच्या 'प्रेमीं'नी कोर्ट परिसरात मोठा गोंधळ घातला. यात सुमारे 40 लोकांचा मृत्यू झाला तर सुमारे 200 लोक जखमी झाले.
  2017 : दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपला. निकालासाठी 25 ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली. यावेळीच बाबा दोषी घोषित होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
  2017 : सीबीआय कोर्टाने दैनंदिन सुनावणी करण्याचे आदेश दिले. निकाल लवकर लावता येईल असा उद्देश या मागे होता. त्यानुसार दररोज सुनावणी सुरु झाली. लवकरच निकाल लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या.
  2017 : बाबा राम रहीमच्या परदेश प्रवासावर कोर्चाने बंदी घातली. त्यावर बाबांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे त्याला विदेशातील आश्रमाला भेटी देणे अशक्य झाले. तसेच विदेशात पळून जाण्याची शक्यता जवळपास मावळली.
  2016 : सुनावणीदरम्यान 52 साक्षिदारांचा जबाब नोंदवण्यात आला. यात 15 सरकारकडून आणि 37 बचाव पक्षाचे साक्षिदार होते. या साक्षिदारांचा जबाब महत्त्वपूर्ण ठरला. त्यामुळे परिस्थितीजन्य पुरावे नसतानाही बाबाला दोषी घोषित करण्यात आले.
  2011 ते 2016 : या दरम्यान या प्रकरणाचा खटला चालला. राम रहीमकडून त्याचे वकील खटला लढत होते. त्यांनी बाबा निर्दोष असल्याचे वारंवार ठासून सांगितले. बाबांवर उगाच खटला चालवला जात असल्याचा युक्तिवाद केला.
  2008 : प्रकरणाचा खटला सुरु झाला. राम रहीमविरोधात आरोप निश्चित करण्यात आले. यात बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला होता. तेव्हापासूनच बाबांची साडेसाती सुरु झाली. बाबाला घाम फुटला.
  2007 : सीबीआयने या प्रकरणाचा तपास पूर्ण करुन अंबाला सीबीआय कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. सुरक्षा आणि गोपनियतेच्या कारणास्तव हे प्रकरण अंबालावरुन पंचकुला सीबीआय कोर्टात ट्रान्सफर करण्यात आले. 1999 आणि 2001 यादरम्यान आश्रमात आणखी काही साध्वींचंही लैंगिक शोषण झाल्याचाही आरोप ठेवण्यात आला होता. पण या साध्वी पुढे आल्या नाहीत.
  2003 : या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा यासाठी सीबीआयकडे तपास सोपवण्यात आला. तपास अधिकारी सतीश डागर यांच्या नेतृत्वात चौकशी सुरु करण्यात आली. 2005-2006 मध्ये पीडित साध्वीला शोधून काढण्यात आले.
  2002 : राम रहीमविरोधात कलम 376, 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे बाबा संकटात सापडला. कायदा काय असतो याचा भास त्याला झाला.
  2002 : तपासाची जबाबदारी सिरसा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांवर सोपवण्यात आली. त्यांनी बाबांवर असलेल्या आरोपांची तीव्र दखल घेतली.
  2002 : साध्वींचे शारीरिक शोषण केल्याचा आरोप गुरमीत राम रहीमवर करण्यात आले. अशा अनेक साध्वींचे बाबाने लैंगिक शोषण केले होते.
  2002- पीडित साध्वीने पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंजाब व हरियाणा कोर्टाला निनावी पत्र लिहून घटनेची तक्रार दिली होती. त्यावरच हे प्रकरण चालले. त्यातून या गुन्ह्याला वाचा फुटली.

Trending