आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: किन्नर बनून मागत होता पैसे, खर्‍या किन्नरांनी केली धुलाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नकली किन्नरला पकडल्यावर त्याला मारताना असली किन्नर)

अंबाला
- केसरी गावात नकली किन्नर बनून लोकांकडून पैसे घेत असलेल्या एका मुलाला खर्‍या किन्नरानी पकडून चांगलेच चोपले. तसेच त्याला दुचाकीवरून फिरवत असलेल्या तरुणालाही या किन्नरांनी गाडीत बसवून कँटच्या महंत पारो शर्मा यांच्याकडे नेण्यात आले. तेथे त्यांना चांगलेच फटकावले आणि नंतर या दोघांना हाउसिंग बोर्ड पोलिस ठाण्यात नेण्यात आले. या दोन्ही तरूणांनी माफी मागितल्यावर त्यांना सोडून देण्यात आले.

पकडलेला मुलगा केसरी गावातील
महंत पारो शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहबादच्या इशरहेडी गावात राहाणारा सतीश मागील अनेक वर्षांपासून या भागात मल्लिका नावाने वावरत होता. तसेच तो गावात आणि वसाहतींमध्ये जाऊन पैसे मागत होता. तसेच जे लोक पैसे देत नव्हते त्यांना शाप देण्यासही तो कतरत नसे. लोकांना घाबरवून, धमकी देऊन त्यांच्या घरातील सामान तो न्यायचा. आम्ही त्याला पकडण्यासाठी सापळाही रचला होता.
सतीश केसरी गावात त्याचा साथीदार सलीमसोबत एका डॉक्टरच्या घरात जबरदस्ती पैसे मागत असताना पकडला गेला. त्याला किन्नर पायल, शालू, प्रीती, आचल आणि शिवानी यांनी पकडून सरळ कँट येथील डेर्‍यावर नेले. तेथे त्याची तपासणी केल्यावर सतीन किन्नर नसून मुलगा असल्याचे कळाले. सतीश चार वर्षांपूर्वीही असेच किन्नर बनून लोकांकडून पैसे घेताना पकडला गेला होता. तेव्हाही तो माफी मागून सुटला. शनिवारी सतीशच्या बॅगमधून सुट, इतर कपडे तसेच खाण्यापिण्याच्या वस्तू मिळाल्या.

पुढील स्लाईडवर पाहा, या संपूर्ण घटनेचे फोटो...