आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओरडून सांगणार्‍यांचे खरेच असते असे नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माहेम (हरियाणा) - जो ओरडून सांगतो, तो खरेच बोलतो असे नाही, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हरियाणात पंतप्रधान नरेंद्र मोदी देत असलेल्या आश्वासनांवर टीका केली. रोहतक जिल्ह्यात माहेममध्ये सोनियांनी विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला.

पोकळ आश्वासने देऊन देशाचा विकास होत नसतो. यासाठी प्रामािणक प्रयत्न आिण शुद्ध हेतू असतात. देशाला विकासाच्या या टप्प्यावर पोहचवण्याकरिता अनेकांनी आपले रक्त आटवले आहे. मात्र, आपण सत्तेत आल्यावरच हे बदल घडून आलयाचा दावा हे भाजपवाले करत असल्याचे सोनिया म्हणाल्या. इतरांनी केलेल्या कामांचे श्रेय लाटण्यातच यांचा आनंद आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री भुपेंद्रसिंह हुड्डा यांच्या नेतृत्वाखाली हरियाणाने दहा वर्षांत हरियाणाचा चेहरा मोहरा बदलला असल्याचे सोनिया म्हणाल्या.
भंपकपणा उघड
लोकसभा निवडणूक प्रचारात मोदींनी दिलेल्या आश्वासनांची आठवण सोनियांनी दिली. युवकांना रोजगार मिळाला का, महागाई कमी झाली का, शंभर दिवसांत विदेशातील काळा पैसा आणण्याचे काय झाले, असे प्रश्न उपस्थित केले. यासाठी काहीही पावले उचलली नाहीत, असे त्या म्हणाल्या.