आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षकाने दहावीच्या विद्यार्थीनीला मागितला किस, नातलगांनी कानाखाली काढला जाळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानीपत/अंबाला- पूजा विहार येथील गगन पब्लिक स्कूलचे शिक्षक हरदीपसिंग यांनी किस मागून छेड काढल्याचा आरोप एका विद्यार्थीनीने केला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणले. यावेळी विद्यार्थीनीच्या नातलगांनी शिक्षकाच्या कानाखाली जाळ काढला. या प्रकरणी पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ट्यूशन घेण्याच्या नावाखाली काढली छेड
संबंधित विद्यार्थीनी करधान गावाची रहिवासी आहे. दहावीच्या परिक्षेत तीन पेपरमध्ये कमी मार्क पडले होते. त्यामुळे ट्यूशन लावण्यासाठी विद्यार्थीनी गगन पब्लिक स्कूलमध्ये आली होती. फी भरुन तिने प्रवेश घेतला होता. गेल्या दोन दिवसांपासून शिक्षक तिची छेड काढत होता. मी स्पर्श केल्याने काही प्रॉब्लेम नाही ना, असे विचारीत होता. जर काही समस्या असेल तर वहित तसे लिहून कळव असे सांगत होता.
केबिनमध्ये बोलवून मागितला किस
एका दिवशी शिक्षकाने केबिनमध्ये बोलविले. किस मागितला. किस दिला नाही तर शाळेतून काढून टाकेल असे बजावले. घरी आल्यावर विद्यार्थीनीने सगळी हकिकत आईला सांगितली. त्यानंतर तिचे नातलग शिक्षकाच्या घरी गेले. तेव्हा शिक्षक आणि नातलगांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.
नातलगांनी पोलिस ठाण्यात केले मारहाण
विद्यार्थीनीचे नातलग काही लोकांसह शाळेत गेले. तेव्हा हंगामा झाला. याची माहिती मिळाल्यावर पोलिस पथक शाळेत आले. शिक्षकाला पकडून पोलिस ठाण्यात घेऊन गेले. विद्यार्थीनीच्या नातलगांनी तेथे शिक्षकाला मारहाण केली. त्याच्या कानाखाली मारल्या.
पुढील स्लाईडवर बघा, इतर फोटो....