(हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकास चौटाला)
नवी दिल्ली - दिल्ली हायकोर्टाने हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि इनेलोचे प्रमुख ओमप्रकाश चौटाला यांना शनिवारी कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षक भरती घोटाळ्याचा तपास करत असलेल्या सीबीआयच्या अर्जावर कोर्टाने हा निर्णय सुनावला आहे. चौटाला यांचा जामीन रद्द करत कोर्टने त्यांना तुरूंगात टाकण्याचे आदेश दिले आहेत. चौटाला यांना शिक्षक भरती घोटाळ्यात 10 वर्षांची शिक्षा झाली आहे.
हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत आता चौटाला प्रचार करू शकत नाहीत. दिल्ली हायकोर्टाने सीबीआयच्या याचिकेवर चौटाला यांना कोर्टात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. गुरूवारी कोर्टाने सांगितले, चौटाला यांची बाजू ऐकण्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. कोर्टाने चौटाला यांना वैद्यकिय उपचारासाठी जामिनावर सोडले होते, मात्र आता हरियाणा
लोकसभा निवडणूकीसाठी चौटाला आता प्रचार करत आहेत. राज्यात 15 ऑक्टोबरला मतदान होणार आहे, तर निवडणूकीचा प्रचार13 ऑक्टोबरच्या रात्री संपेल
कोर्टाने जेबीटी शिक्षक भरती घोटाळ्यात दोषी आढळलेल्या चौटाला यांना 10 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. यानंतर कोर्टाने चौटाला यांना वैद्यकिय उपचारासाठी जामिन दिला होता. मात्र सर्व चिकित्सा प्रमाणपत्रांचा त्यांनी दुरूपयोग केल्याचे आढळून आल्याने न्यायालयाने त्यांचा जामिन रद्द केला आहे.