आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन अल्पवयीनांची लग्ने रोखण्यासाठी धावाधाव महिला संरक्षण अधिकाऱ्याकडे नव्हते वाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानिपत (हरियाणा) : दोन अल्पवयीन मुलींची लग्ने थांबवण्याऐवजी वऱ्हाडी मंडळींसह वधू आणि तिच्या आईवडिलांना पोलिसांनी थेट ठाण्यातच आणले. तथापि, सहा तासांच्या नाट्यानंतर त्यांचा विवाह समारंभ रद्द झाला, हा भाग वेगळा. ही घटना हरियाणातील पानिपत महिला पोलिस ठाण्यातील आहे.

पानिपत येथील महिला संरक्षण अधिकारी रजनी गुप्ता यांना इसराना ठाण्यातील जोंधन कला गावात दोन अल्पवयीन मुलींची लग्ने होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी यासंदर्भात पानिपत महिला पोलिस ठाण्यास सूचना दिल्या. तसेच घटनास्थळी जाऊन विवाह रोखण्यासाठी सहकार्य मागितले. परंतु ठाण्याच्या प्रभारींनी वाहन नसल्याची सबब पुढे केली. तेव्हा त्यांनी इसराना पोलिस ठाण्यास कळवले.
इसराना पोलिसांनी त्यांना येण्याची विनंती केली. वाहन नसल्याचे कळवल्यानंतर इसराना पोलिसांनी वऱ्हाडी मंडळी, सरपंच, वधू आणि तिच्या आईवडिलांना घेऊन थेट पानिपत पोलिस ठाण्यात आणले. सहा तास हा वाद पोलिस ठाण्यात रंगला. शेवटी दोन्ही पक्षांनी विवाह रद्द करण्याचे ठरवले. सरपंचांनी दोन्ही मुली १८ वर्षांच्या झाल्यानंतर त्यांची लग्ने लावून देण्याचे कबूल केले.
बातम्या आणखी आहेत...