आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Uber च्या ड्रायव्हरने महिला प्रवाशाला बळजबरी किस करण्याचा केला प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- गुडगावला जात असताना उबर कंपनीच्या टॅक्सी ड्रायव्हरने हाताला किस केला. त्यानंतर बळजबरी मला किस करण्याचा प्रयत्न केला असा आरोप एका महिला प्रवाशाने केला आहे. या प्रकरणी ड्रायव्हर विनोद याला अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात संबंधित युवती म्हणाली, की मी गुडगावला पोहोचले. त्यानंतर ड्रायव्हरने माझ्या दोन बॅग्ज दिल्या. मी तिसरी बॅग मागितली. तेव्हा तो म्हणाला, की मला तुमच्यासोबत हात मिळवायचा आहे. मी आक्षेप घेतला नाही. हलक्या हाताने हात मिळवला. तेव्हा तो म्हणाला, की तुम्हाला भेटून आनंद झाला. मला वाटले तो चांगला माणूस आहे. पण त्यानंतर त्याने माझ्या हाताला किस केले. मी माझा हात लगेच मागे खेचला. तेव्हा त्याने माझा हात सोडला नाही. बळजबरी मला किस करण्याचा प्रयत्न केला.
या महिलेच्या भावाने उबरवर जोरदार प्रहार केला आहे. त्याने यासंदर्भात फेसबुक पोस्ट टाकली आहे. त्याला बऱ्याच लाईक मिळाल्या आहेत.
तो म्हणाला, की माझ्या बहिणीने गुडगावला जाण्यासाठी तुमची टॅक्सी बुक केली होती. तुमचा चालक विनोद याने माझ्या बहिणीच्या हाताला किस केला. तिचा हात धरुन ठेवला. तिला किस करण्याचा प्रयत्न केला. मी याची तक्रार दिली. त्यावर तुम्ही कोणतीही कारवाई केलेली नाही.

पुढील स्लाईडवर बघा, पोलिसांनी ड्रायव्हरला अटक केली....