आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण साई प्रकरणातील मुख्य साक्षीदारावर हल्लेखोराचा गोळीबार, प्रकृती चिंताजनक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानिपत/सनौली- आसाराम बापुचा मुलगा नारायण साई याच्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार महेंद्र चावला यांच्यावर आज (बुधवार) सकाळी गोळीबार झाला. चावला यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याचे समजते.
पानीपतजवळ असलेल्या सनौली खुर्द भागातील ते रहिवासी आहेत. 1998 ते 2005 दरम्यान महेंद्र चावला हे नारायण साईचे पीए होते. आसाराम बापुला अटक झाल्यावर चावला यांनी नारायण साईच्या वाईट कृत्यांची माहिती पोलिसांना दिली होती. सूरत आणि अहमदाबाद हायकोर्टमध्येही नारायण साईविरुद्ध साक्ष दिली होती.
अशी घडली घडना
आज सकाळी सुमारे 8.30 वाजता महेंद्र चावला घराच्या गच्चीवर कपडे वाळायला टाकत होते. त्यांचे लग्न व्हायचे आहे. घरी ते एकटेच राहतात. यावेळी पल्सरवर आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर जवळून गोळीबार केला. गोळीबार केल्यावर हल्लेखोर फरार झाले. गोली लागल्याने चावला गंभीर जखमी झाले. त्यांच्या शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.
यापूर्वी मिळाल्या होत्या धमक्या
साक्ष फिरवावी यासाठी महेंद्र चावला यांना आसाराम आणि नारायण साई समर्थकांकडून धमक्या मिळत होत्या. याची माहिती त्यांनी अनेकदा पोलिसांना दिली होती. यामुळे त्यांना एक बॉडीगार्ड देण्यात आला होता. परंतु, आज तो सुटीवर होता. याचा फायदा उचलत हल्लेखोरांनी चावला यांना गोळ्या घातल्या.
पुढील स्लाईडवर बघा, असे दाखल करण्यात आले नारायण साई प्रकरणातील साक्षीदार महेंद्र चावला यांना...