आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman IPS Officer Had Send Minister Anil Vij To Jail

या IPS ने हरियाणाचे मंत्री अनिल विज यांना टाकले होते तुरुंगात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाला (हरियाणा)- शासकीय बैठकीत हरियाणाचे मंत्री अनिल विज यांच्यासोबत बाचाबाची झाल्यानंतर पोलिस आयुक्त संगीता कालिया यांची बदली करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे ते निवटवर्तीय समजले जातात. पण या मंत्र्यालाही एका महिला आयपीएस अधिकाऱ्याने तुरुंगाची हवा खायला लावली होती.
अंबाला पोलिसांशी झाला होता वाद
काही वर्षांपूर्वी अंबाला कॅंटोनमेंट परिसरात राहत असलेल्या एका व्यक्तीचे एका पोलिस अधिकाऱ्यासोबत भांडण झाले. यावेळी अनिल विज येथे दाखल झाले. त्यांनी पोलिसाला समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना समजूत घालता आली नाही. त्यानंतर विज आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. पोलिसावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली होती. पण दबंग डेली आयपीएस या नावाने परिचित असलेल्या भारती अरोडा यांनी विज यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक केली. सरकारी कामकाजात हस्तक्षेप केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. यावेळी त्यांना एक रात्र कारागृहात काढावी लागली होती. पण न्यायालयात झालेल्या सुनावणीत त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले.
छापेमारीसाठी आहेत प्रसिद्ध
अनिल विज यांची छापेमार मंत्री अशी हरियाणात ओळख आहे. मंत्री झाल्यानंतर त्यांनी अनेक रुग्णालये आणि सरकारी विभागांवर छापे मारले आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. विज आधी एका बॅंकेत नोकरी करायचे. नोकरी सोडून ते राजकारणात दाखल झाले आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, असे शासकीय कर्मचाऱ्यांना खडसावतात अनिल विज... आहेत मुख्यमंत्री खट्टर यांचे निकटवर्तीय...