आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक निकालाच्या 4 तासांपूर्वी झाली आई, \'सरपंच\' महिलेने पोराचे नाव ठेवले \'सरपंच\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कैथल (हरियाणा)- मालखेडी गावातील सरपंचपदाची उमेदवार पूनम बेदीने रविवारी दुपारी सुमारे एक वाजता एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्याच दिवशी सायंकाळी सुमारे पाच वाजता पूनमची निवड सरपंच म्हणून करण्यात आली. सरपंच पदाने आणि पूनम आई झाल्याने कुटुंबाला डबल आनंद झाला. याची आठवण राहावी म्हणून नवजात बालकाचे नाव चक्क 'सरपंच' ठेवण्यात आले.
निवडणूक इतिहास रचण्यासाठी मुलाचे नाव ठेवले सरपंच
- मालखेडी गावात पहिल्यांदाच एससी समाजाच्या महिलेसाठी सरपंचपद राखिव ठेवण्यात आले होते. त्यामुळे या समाजातील अनेक महिला निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या.
- वाल्मिकी समाजाची पूनम बेदी गर्भवती असतानाही या निवडणुकीत उतरली होती.
- कुटुंबातील सदस्यांनी पूनमचा प्रचार केला. तिला गावातील 500 मते मिळाली. 150 मतांनी ती विजयी झाली.
- पत्नी सरपंच झाली आणि पूनम आई झाली या डबल आनंदाने पोराचे नाव सरपंच ठेवले, असे तिच्या पतीने सांगितले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, मतदानासाठी अशा लागल्या होत्या रांगा... तसेच इतर फोटो...
बातम्या आणखी आहेत...