आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी@3: सोशल मीडियापासून ते ग्राऊंड रिपोर्टपर्यंत.. प्रत्येक पैलुचे विश्लेषण, पोस्टमॉर्टेम..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आज (26 मे) मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली. सरकारच्या चांगल्या-वाईट निर्णयांचा आपल्यावर काय परिणाम झाला, हे जाणून घेण्यासाठी भास्कर समूहाने 15 प्रश्न विचारले होते. 62% लोकांचे म्हणणे आहे की, त्यांना आजही दैनंदिन आयुष्यात भ्रष्टाचाराचा सामना करावा लागतो. यापैकी 42% लोकांचा भ्रष्टाचाराबाबत परिस्थिती सुधारली नसल्याचा दावा आहे.

पाकिस्तानबद्दलच्या धोरणावरही लोकांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. 55% लोकांच्या मते याबाबत निराशाजनक कामगिरी आहे. सर्व्हेत सामील ६१% लोकांनी मान्य केले की, प्रत्येक मुद्द्यावर दिलखुलास बोलणारे मोदी वादग्रस्त मुद्द्यांवर मूग गिळून बसतात.

सर्जिकल स्टाइक, नोटाबंदी, लाल दिवा संस्कृती संपुष्टात आणण्याच्या मोदींच्या निर्णयांना सर्व्हेतील लोकांनी चांगले पाऊल म्हटले आहे. नोटाबंदीच्या पद्धतीवर लोकांनी या सर्वेक्षणातूनही संताप व्यक्त केला. 82% लोकांच्या मते नोटाबंदी हे चांगले पाऊल होते. तर, 52% लोकांनी नोटाबंदी राबवण्यासाठी पद्धत निराशाजनक असल्याचे म्हटले. एकंदरीत 43% लोक मोदींना काम करणारे आणि करून घेणारे पंतप्रधान मानतात.  सामान्य जनतेशी संबंधित सर्वात प्रमुख मुद्दा म्हणजे महागाईवरून लोकांनी मोदी सरकारला कोंडीत पकडले आहे. 40% लोकांच्या मते 3 वर्षांत महागाई कमी होण्याऐवजी वाढली आहे.
 
29 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत झालेल्या या सर्वेक्षणात 2 लाखांहून अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. देशातील कोणत्याही सरकारच्या कामगिरीवर आजवर करण्यात आलेले हे सर्वात मोठे सर्वेक्षण ठरले आहे.

मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या पार्श्वभूमीवर भास्कर /दिव्य मराठी सर्वेक्षणात देशभरातून विक्रमी 2,03,249 लोकांनी त्यांचे मत मांडले आहे. नऊ दिवस चाललेल्या या सर्वेक्षणातील माहितीचे विश्लेषण मार्केट सेपियन्स या व्यावसायिक सर्वेक्षण संस्थेने केले आहे.  

मोदी सरकारच्या कामकाजाच्या सरकारने केलेल्या कामगिरीचे सर्व स्तरावर विश्लेषण होत आहे.
अशातच www.divyamarathi.com ने सुद्धा सर्व अंगानी विश्लेषण केले आहे. याशिवाय मोदी सरकारचे तीन प्रभावी निर्णय, चर्चेत राहिलेले तीन मुद्दे, किस्से, जोक्स त्याचबरोबर सोशल मीडियापासून ते ग्राऊंड रिपोर्टपर्यंत.. प्रत्येक पैलुचे विश्लेषण, पोस्टमॉर्टेम..वाचा खालील लिंकवर क्लिक करून...

> मोदी@3: 'मेरा भाषण ही मेरा शासन...'बाहुबली ते दंगल'पर्यंतचे 9 डायलॉग्समध्ये मोदींचा अंदाज
> मोदी@3: मोदी सरकारचे 3 पॉइंट अॅनालिसिस: 6 मुद्द्यांवरून जाणून घ्या कसा राहिला परफॉर्मन्स
> मोदी@3: मोदींना आवडते भेंडी-कढी आणि श्रीखंड, हे आहेत त्यांचे फेव्हरेट फूड
> मोदी@3: स्टाईल आयकॉन ते राष्ट्रवादी प्रतिमा..15 फॅक्ट्‍समधून समजून घ्या नरेंद्र मोदींचे व्यक्तिमत्त्व!
> मोदी@3: सोशल मीडियापासून ते ग्राऊंड रिपोर्टपर्यंत.. प्रत्येक पैलुचे विश्लेषण, पोस्टमॉर्टेम..
>मोदी@3: प्रत्येक मुद्द्यावर भरभरून बोलणारे मोदी..राम मंदिर, कत्तलखाने व दलितांच्या मुद्यांवर चिडीचूप
> मोदी@3: VIDEO: शपथ ते जाधव यांच्या फाशीवर स्थगिती, असे राहीले मोदी सरकारचे 3 वर्ष
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...