आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 3 Years Of Narendra Modi As A PM Of India. Photos Of Narendra Modi Village Vadnagar

मोदी सरकारची 3 वर्षे: या रेल्वे स्टेशनवर याच दुकानात चहा विकायचे नरेंद्र मोदी, असे गेले बालपण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडनगर रेल्वे स्टेशन... नरेंद्र मोदी बालपणी चहा विकायचे - Divya Marathi
वडनगर रेल्वे स्टेशन... नरेंद्र मोदी बालपणी चहा विकायचे
अहमदाबाद- केंद्रात सत्तेवर असलेले मोदी सरकार येत्या 26 मे रोजी यशस्वी तीन पूर्ण करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तीन वर्षांच्या काळात देशहीत आणि जनहिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. ते देशातच नव्हे तर विदेशातही चर्चेत आहेत. इतकेच नाही तर नरेंद्र मोदींचे जन्मस्थळ असलेले वडनगरचे (गुजरात) नाव आज जगाच्या नकाशावर आले आहे.

वडनगर येथील रेल्वे स्टेशनवर एके काळी नरेंद्र मोदी चहा विकायचे काम करत करत होते. वडनगरमध्येच त्यांचे बालपण गेले. येथील शर्मिष्ठा तलावावर मोदी खेळायचे. एकदा तर त्यांनी या तलावाच्या काठावरून एक मगरीचे पिल्लू उचलून घरी आणले होते. आज या तलावाचा कायापालट झाला आहे. वडनगरतील शाळा व लायब्ररी तसेच प्रत्येक स्थळावर मोदींच्या आठवणी आहेत.

पुढील स्लाइडवर पाहा, नरेंद्र मोदी यांनी बालपण घालवलेल्या वडनगरचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...