आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी@3: पंतप्रधान मोदींचे 15 फोटोज्, या छायाचित्रांमुळे पीएम मोदींची जगभरात चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रातील मोदी सरकार येत्या 26 जुनला आपले तीन वर्षे पुर्ण करत आहे. या तीन वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या न कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत राहिले. कधी अचानक घेतलेला नोटा बंदीचा निर्णय, तर कधी सर्जिकल स्ट्राइक. मेक इन इंडिया कॅम्पेनच्या माध्यमातून  आणि परदेश दौऱ्यातून त्यांनी अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. याच निमित्ताने divyamarathi.com तुम्हाला असे 15 फोटो दाखवत आहे, ज्यांच्यामुळे मोदींबद्दल मीडियाने बातम्यांतून चर्चा केली गेली.

जापान दौऱ्यात वाजवला ड्रम...
> जापान दौऱ्यात चौथ्या दिवशी टोक्यो येथे टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेसच्या उद्घाटन समारंभात पोहोचलेल्या मोदींनी जापानचे पारंपारिक वाद्य ड्रम वाजवले होते.
> मोदींनी ड्रम वाजवण्याआधी ड्रम वाजवणाऱ्यांचे निरिक्षन केले. त्यानंतर स्वत: ड्रम वाजवले.
> जापान दौऱ्यात मोदींचा हा अंदाज मीडियात चर्चेचा विषय बनला होता.

पुढील स्लाइडवर पाहा मोदींचे इतर 14 फोटोज्...
 
नवी दिल्ली- मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या पार्श्वभूमीवर भास्कर /दिव्य मराठी सर्वेक्षणात देशभरातून विक्रमी 2,03,249 लोकांनी त्यांचे मत मांडले आहे. नऊ दिवस चाललेल्या या सर्वेक्षणातील माहितीचे विश्लेषण मार्केट सेपियन्स या व्यावसायिक सर्वेक्षण संस्थेने केले आहे.  

आज मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली. सरकारच्या चांगल्या-वाईट निर्णयांचा आपल्यावर काय परिणाम झाला, हे जाणून घेण्यासाठी भास्कर समूहाने 15 प्रश्न विचारले होते. 29 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत झालेल्या या सर्वेक्षणात 2 लाखांहून अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. देशातील कोणत्याही सरकारच्या कामगिरीवर आजवर करण्यात आलेले हे सर्वात मोठे सर्वेक्षण ठरले आहे.
 
सर्जिकल स्टाइक, नोटाबंदी, लाल दिवा संस्कृती संपुष्टात आणण्याच्या मोदींच्या निर्णयांना सर्व्हेतील लोकांनी चांगले पाऊल म्हटले आहे. नोटाबंदीच्या पद्धतीवर लोकांनी या सर्वेक्षणातूनही संताप व्यक्त केला. 82% लोकांच्या मते नोटाबंदी हे चांगले पाऊल होते. तर, 52% लोकांनी नोटाबंदी राबवण्यासाठी पद्धत निराशाजनक असल्याचे म्हटले. एकंदरीत 43% लोक मोदींना काम करणारे आणि करून घेणारे पंतप्रधान मानतात.  सामान्य जनतेशी संबंधित सर्वात प्रमुख मुद्दा म्हणजे महागाईवरून लोकांनी मोदी सरकारला कोंडीत पकडले आहे. 40% लोकांच्या मते 3 वर्षांत महागाई कमी होण्याऐवजी वाढली आहे.
 
62% लोकांचे म्हणणे आहे की, त्यांना आजही दैनंदिन आयुष्यात भ्रष्टाचाराचा सामना करावा लागतो. यापैकी 42% लोकांचा भ्रष्टाचाराबाबत परिस्थिती सुधारली नसल्याचा दावा आहे. पाकिस्तानबद्दलच्या धोरणावरही लोकांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. 55% लोकांच्या मते याबाबत निराशाजनक कामगिरी आहे. सर्व्हेत सामील ६१% लोकांनी मान्य केले की, प्रत्येक मुद्द्यावर दिलखुलास बोलणारे मोदी वादग्रस्त मुद्द्यांवर मूग गिळून बसतात. मोदी सरकारच्या कामकाजाच्या स्तराला लोकांनी 10 पैकी 7 गुण दिले आहेत. आज निवडणुका झाल्यास मोदी 2014 पेक्षाही अधिक जागा जिंकतील, असे मत 56% लोकांनी या सर्व्हेत नोंदवले आहे.

- 62% लोकांच्या मते, आजही दैनंदिन आयुष्यात भ्रष्टाचाराचा सामना करावा लागत आहे.
- 68% लोकांच्या मते, मोदी सरकारच्या तीन वर्षांत महागाई घटली नाही.
- 91% लोकांच्या मते, देशात सध्या पुन्हा निवडणूक झाल्यास मोदींचा विजय  
- 59% लोकांनुसार, 2019 मध्ये मोदी २०१४ पेक्षाही जास्त जागा जिंकतील
 
63% लोक काश्मीर मुद्द्यावर नाराज
यापैकी 33%च्या मते-काश्मीरप्रकरणी मोदींच्या केवळ पोकळ चर्चाच, तर 30% च्या मते, मोदींनी काश्मीर मुद्द्यावर जहाल होण्याऐवजी नरमाई दाखवली.
 
सर्वेक्षणाचा निकाल
- मोबाइलवर 7030001040 वर मिस कॉल करा. आपल्याला एक लिंक मिळेल. त्यावर क्लिक करताच आपल्या मोबाइलवर असेल पाॅवर जॅकेट।
- टीव्हीवर REPUBLIC वाहिनीवर आज सायं. 06:00 वा. देशातील सर्वात मोठ्या सर्व्हेचा निकाल विश्लेषण.

पुढील स्‍लाइडवर वाचा, आपल्या बहुमूल्य उत्तरांतून तयार झालेले मोदी सरकारचे प्रगतीपुस्तक...

> मोदी@3: स्टाईल आयकॉन ते राष्ट्रवादी प्रतिमा..15 फॅक्ट्‍समधून समजून घ्या नरेंद्र मोदींचे व्यक्तिमत्त्व!
> मोदी@3: सोशल मीडियापासून ते ग्राऊंड रिपोर्टपर्यंत.. प्रत्येक पैलुचे विश्लेषण, पोस्टमॉर्टेम..
>मोदी@3: प्रत्येक मुद्द्यावर भरभरून बोलणारे मोदी..राम मंदिर, कत्तलखाने व दलितांच्या मुद्यांवर चिडीचूप
> मोदी@3: VIDEO: शपथ ते जाधव यांच्या फाशीवर स्थगिती, असे राहीले मोदी सरकारचे 3 वर्ष

 
बातम्या आणखी आहेत...