आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 वर्षीय कोनराड संगमा बनले मेघालयाचे सर्वात तरुण मुख्यमंत्री; ईशान्येकडील 3 राज्यांत सत्ता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिलाँग- एनपीपीचे अध्यक्ष कोनराड संगमा मेघालयाचे बारावे मुख्यमंत्री बनले आहेत. ४० वर्षीय कोनराड राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले असून राजधानी शिलाँगमध्ये हा समारंभ पार पडला.

राज्यात एनपीपी, एनडीए सरकारमधील सहकारी पक्ष आहेत. राज्यपाल गंगाप्रसाद यांनी कोनराड व ११ आमदारांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधी समारंभाला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. कोनराड संगमा सध्या तुरा लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. आघाडी सरकार चालवणे हे आव्हान असते. सोबत घेऊन वाटचाल करू, असे कोनराड यांनी मंगळवारी शपथविधीनंतर स्पष्ट केले.
 
त्रिपुरा: त्रिपुरामध्ये बिप्लव कुमार देब मुख्यमंत्री, जिष्णु बर्मन उपमुख्यमंत्री
भाजपचे अध्यक्ष बिप्लव कुमार देब त्रिपुराचे नूतन मुख्यमंत्री असतील तर आदिवासी नेते जिष्णू बर्मन उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळतील. पक्ष निरीक्षक मनितीन गडकरी यांनी बिप्लव यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सूत्रे सोपवल्याची मंगळवारी घोषणा केली. जिष्णु देव जनजाती मोर्चाचे अध्यक्ष आहेत.   निवडणुकीत २० जागा जागा राखीव होत्या. त्यापैकी १८ ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत.
 
 
नागालँड: सरकार स्थापनेसाठी प्रयत्न असल्याचा जेलियांग यांचा दावा
नागालँडमध्ये सरकार स्थापनेवरून रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपने राज्यात सरकार स्थापन करण्यासाठीच्या हालचाली वाढवल्या आहेत. दुसरीकडे राज्यात घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण एनपीएफचे मावळते मुख्यमंत्री टी.आर. जेलियांग यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. नवीन सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. तोपर्यंत काहीही निर्णय घेतला जाणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतल्याने पेच वाढू शकतो.
 
 
कोनराड यांनी दिले 34 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र 
- रविवारी सायंकाळी कोनराड यांनी राज्यपाल गंगाप्रसाद यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला होता. तसेच त्यांनी 34 आमदारांच्या समर्थनाचे पत्रही सादर केले होते. 
- राज्यपालांना भेटल्यानंतर कोनराड संगमा म्हणाले, आघाडीचे सरकार चालवणे सोपे नसते, पण मला माहिती आहे की, आमच्याबरोबर आलेले आमदार राज्य आणि जनतेप्रती वचनबद्ध आहेत. आम्ही राज्याच्या विकासासाठी मिळून मिसळून काम करू. 
- भाजपचे हेमंत बिस्वा म्हणाले की, कोनराड संगमा राज्याचे मुख्यमंत्री असतील. नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री नसेल. आघाडीत सहभागी झालेल्या प्रत्येक पक्षाच्या दोन दोन आमदारांपैकी एकाचा सत्तेत समावेश असेल. 
 
कोण आहेत कोनराड संगमा
- कोनराड संगमा यांचा जन्म 27 जानेवारी, 1978 ला झाला होता. मेघालयचे माजी मुख्यमंत्री (1988-91) आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष (1996-98) राहिलेल्या पीए संगमा यांचे पुत्र आहेत. त्यांची बहीण अगाथा संगमा काँग्रेसच्या युपीए सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले आहे. कोनराड यांचे भाऊ जेम्स संगमा गेल्या विधानसभा (2013-18) मध्ये विरोधीपक्ष नेते होते. 
- त्याशिवाय कोनराड सेल्सेसामधील आमदार आणि विरोधीपक्ष नेते राहिलेले आहेत. 
- ते साऊथ तुरा मतदारसंघातील सदस्य आहेत. 
 
असे आहे सत्तेचे गणित - बहुमताचा आकडा 31 आहे 
कोनराड यांच्या आघाडी सरकारमध्ये खालीलप्रमाणेॉ विविध पक्षांचे आमदार आहेत.
नॅशनल पिपल्स पार्टी (एनपीपी) 19
भाजप 02
युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी (युपीडी) 06
पिपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट (पीडीपी) 04
हिल स्टेट पीपुल्स डेमोक्रेटिक पार्टी (एचएसपीडीपी) 02
अपक्ष 01
एकूण 34
 
बातम्या आणखी आहेत...