आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी@3: मिशन मोदी..लोकसभा निवडणुकीनंतर 17 राज्यांत भाजप सत्तेत, आता पुढे हे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२०१९ : जून-डिसेंबर  - ३ राज्यांत निवडणूक
 
> महाराष्ट्र : भाजपने २०१४ मध्ये प्रथमच शिवसेनेशी आघाडी न करता निवडणूक लढवली होती आणि सर्वात मोठा पक्ष ठरला होता. बृहन मुंबई महापालिका, इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयाने भाजपच्या आशा बुलंद आहेत.

> हरियाणा : वर्ष २०१४ मध्ये भाजपने येथे प्रथमच स्वबळावर सरकार बनवले होते. जाट आंदोलनामुळे भाजपची स्थिती कमकुवत. आता मतांच्या ध्रुवीकरणाचाच सहारा. 
 
> झारखंड : भाजपने येथे आघाडी सरकार बनवले आहे. पक्षाच्या बड्या नेत्यांच्या गटबाजीमुळे नुकसान शक्य.
 
 २०१९ : लोकसभा निवडणूक
>‘मिशन २०१९’ अंतर्गत भाजपने लोकसभेच्या ४०० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भाजप अध्यक्ष अमित शहांनी तयारी सुरू केली आहे. जेथे भाजपची उपस्थिती नगण्य आहे अशा राज्यांचा दौरा ते करत आहेत. काँग्रेसनेही संघटनेत मोठ्या फेरबदलाची तयारी सुरू केली आहे.
 
>२०१९ : जानेवारी-मे विधानसभा निवडणूक : आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, अरुणाचल, सिक्कीम, पुडुचेरीत निवडणुका. सध्या आंध्र, अरुणाचल, सिक्कीममध्ये रालोआचे सरकार आहे. अरुणाचलमध्ये पीपीएचे ३३ आमदार भाजपत सामील झाले होते.
 
गोवा, मणिपूर आणि अरुणाचलमध्ये सत्ता स्थापनेचा घातला मेळ 
येथे मिळाले यश
> २०१४ मध्ये मोदी सत्तेत आल्यानंतर भाजपने हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड, २०१६ मध्ये आसाम आणि २०१७ मध्ये उप्र, उत्तराखंड, गोवा, मणिपूरमध्ये सरकार बनवले.
 
येथे आघाडी
> सिक्कीम, नागालँड, आंध्र, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, झारखंड, आसाम, मणिपूर, गोव्यात आघाडी करून सरकार स्थापन केले. त्यापैकी ५ राज्यांत भाजपचे मुख्यमंत्री आहेत.
 
येथे झाले भक्कम
>भाजपने केरळमध्ये १ विधानसभा जागा आणि पश्चिम बंगालमध्ये ३ जागा जिंकून खाते उघडले. अरुणाचल प्रदेशात पक्षांतर करून सरकार बनवले.
 
येथे आले अपयश
> २०१५ मध्ये भाजपचा सर्वात मोठा पराभव बिहार आणि दिल्लीत झाला. दिल्लीत ३१ वरून ३ जागांवर घसरण. २०१७ मध्ये पंजाबमध्ये अकाली-भाजप आघाडीचा पराभव.
 
काँग्रेसला टक्कर
>
मप्र, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसशी थेट टक्कर आहे. त्यापैकी हिमाचल वगळता ४ राज्यांत भाजपचे सरकार आहे.
 
येथे उपस्थिती नाही
>तामिळनाडू, त्रिपुरा, पुडुचेरी, मेघालय, मिझोराममध्ये भाजपची एकही जागा नाही. फक्त मतांची टक्केवारी वाढली आहे. पक्ष संघाच्या मदतीने पाया मजबूत करत आहे.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, २०१७ चा राजकीय नकाशा आणि आता पुढे हे...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...