Home | National | Modi 3 Years | Marathi Bengali, Gujarati are national language Like the Hindi

मराठी, बंगाली, गुजरातीही हिंदीप्रमाणे राष्ट्रभाषा; प्रसिद्ध गीतकार गुलजार

वृत्तसंस्था | Update - Aug 07, 2017, 03:00 AM IST

हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. पण मराठी, गुजराती, बंगाली यासह इतर भारतीय भाषांना प्रादेशिक भाषा असे संबोधणे योग्य नाही.

 • Marathi Bengali, Gujarati are national language Like the Hindi
  बंगळुरू- हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. पण मराठी, गुजराती, बंगाली यासह इतर भारतीय भाषांना प्रादेशिक भाषा असे संबोधणे योग्य नाही. या सर्व भाषांनादेखील राष्ट्रभाषा मानले गेले पाहिजे, असे विचार प्रसिद्ध गीतकार, कवी गुलजार यांनी व्यक्त केले.

  हिंदीव्यतिरिक्त असलेल्या भाषांचा उल्लेख सर्रास प्रादेशिक भाषा असा केला जातो, परंतु मला तो चुकीचा वाटतो. तामिळ अभिजात आणि अत्यंत महत्त्वाची भाषा आहे. मराठी, गुजराती, बंगालीदेखील अभिजात दर्जाच्या आहेत. त्यांना प्रादेशिक म्हटले जाऊ शकत नाही. बंगळुरू येथील काव्य महोत्सव २०१७ च्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात गुलजार बोलत होते. त्यांच्या हस्ते रविवारी ग्रंथ दालनाचे उद््घाटन झाले.

  गुलजार बोल- महाविद्यालयीन अभ्यासक्रमात कालिदास, युधिष्ठिर का नाही?
  गुलजार यांनी महाविद्यालयीन पातळीवर इंग्लिश साहित्याव्यतिरिक्त भारतीय साहित्यावरही भर दिला जायला हवा, असे आग्रही प्रतिपादन केले. ते म्हणाले, महाविद्यालयातील रया निघून गेली आहे, असा सूर लावला जातो. मग शेक्सपियरच्या बरोबरीने कालिदास, युधिष्ठिर, द्रौपदीविषयी का शिकवले जात नाहीत? अशा विषयांचा महाविद्यालयातील अभ्यासक्रमात समावेश करावा. त्यामुळे भारतीय संस्कृतीला समजून घेता येईल.

  सांस्कृतिक स्वातंत्र्य बाकी
  भारताला राजकीय स्वातंत्र्य तर मिळाले, मात्र सांस्कृतिक स्वातंत्र्य अद्याप मिळाले नाही. अद्यापही आपण वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडलेलो नाहीत असे वाटते.

  नील आर्मस्ट्राँगच्या जाण्याने मी दु:खी झाले होतो...
  नील आर्मस्ट्राँगचे निधन झाले होते तेव्हा मला अतिव दु:ख झाले होते. तेव्हा भारतात त्यांच्याविषयी काेणीही लिहिले नाही. माझ्यासाठी ते मानवतेचे प्रतीक होते. म्हणून मी त्यांच्यावर कविता लिहिली होती. तुकड्या तुकड्यात जगणे आपल्याला आवडू लागले आहे. कारण ते सहज असते. हीच मोठी चूक ठरतेय.

Trending