आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी@3: सरकारचे 3 पॉइंट अॅनालिसिस..तीन प्रभावी निर्णय, आव्हाने, चूका आणि कॉन्ट्रॉव्हर्सीज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदी सरकारने आज (26 मे) आपले तीन वर्षे पूर्ण केली आहेत. मागील 36 महिन्यांत सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. देश आणि देशातील जनतेच्या हिताच्या अपेक्षित गोष्टीही घडल्या. नोटाबंदी आणि सर्जिकल स्ट्राईकसारखे सर्वात मोठे क्रांतिकारी निर्णय घेतले. नंतर त्यावर प्रश्न  उपस्थित झाले. परंतु त्यानंतर देशातील 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत मोदींनी मोठा विजय म‍िळवला. 5 पैकी 4 राज्यांत भाजपचे कमळ फुलले. विशेष म्हणजे मोदी सरकारच्या 3 वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर आम्ही 6 मुद्द्यांवर तज्ज्ञांची मतेही जाणून घेतली आहेत.

DB EXPERT समिती
- रहीस सिंह, (परराष्‍ट्रीय विषयांचे तज्ज्ञ)
- सोमपाल शास्त्री, (माजी सदस्य, प्लॅनिंग कमिशन)
- वेद प्रताप वैदिक, (राजकीय विश्लेषक)
- जितेंद्र सोळंकी, (सेबी नोंदणी गुंतवणूक सल्लागार)
- लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसैन, (संरक्षण तज्ज्ञ)

# सर्वात मोठे 3 निर्णय

1. सर्जिकल स्ट्राइक

केव्हा झाला :  28 सप्टेंबर 2016 मध्ये  भारतीय जवानांनी एलओसी क्रॉस करून दहशतवाद्यांचे 7   कॅम्प उद्धवस्त केले. चार तास ही कारवाई झाली. त्यात 40 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता.

का केले: 18  सप्टेंबर 2016  रोजी 4 दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या उरी येथील लष्कराच्या छावणीवर हल्ला केला होताे. या हल्ल्यात 18 जवान शाहीद झाले होते. नंतर चाहही बाजूंनी जवानांनी घेरुन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

EXPERT VIEW
लष्कराचे नवीन धोरण

- लेफ्टनंट जनरल निवृत्तधिकारी सय्यद अता हसैन म्हणाले की, लष्कराने आपल्या धोरणात ऐनवेळी बदल केले आहेत. सर्जिकल स्ट्राइकला त्यांनी विरोध दर्शविला आहे.  या कारवाईमुळे भारत-पाक ‍सीमेवर तणाव निर्माण झाला आहे.  युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.  शस्त्रुवर विनाकारण गोळीबार करणार नाही, असे लष्कराचे धोरण आहे. मात्र, गरज पडल्यास नक्कीच भारतीय जवान शत्रुवर हल्ला करण्यात ही मागे राहाणार नाही.

सर्जिकल हल्ला परिणामकारक ठरला नाही...
- परराष्ट्रीय सल्लागार रहींस सिंह म्हणतात, सर्जिकल हल्ल्याचे ध्येय दहशतवाद्यांना मुळापासून  संपवणे होते. हल्ला जास्त काळ चालला असता तर भारताचा पाकिस्तानवर प्रभाव पडला असता. परंतु, हा हल्लाप रिणामकारक ठरला नाही. यामुळे पाकिस्तान अजूनही उलट्या बोंबा मारत आहे. या हल्ल्या नंतर देशातील जनतेने मोदी सरकारची भरभरुन प्रशंसा केली. मात्र, उभय देशांच्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. त्यांनी पाकने अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघनही केले आहे. 1 मे रोजी एलओसीवर दोन भारतीय जवानांचे शिरच्छेद केले होते. त्यांनतर भारताने पाकिस्तानच्या लष्करी तळे उद्धवस्त केले होते.

# 2 नोटाबंदी
केव्हा झाली :
8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलेल्या भाषणात नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. रात्री 12 वाजेला 15 लाख कोटींच्या 500-1000 च्या नोटा ( देशातील 87% करन्सी) चलनातून रद्द करण्यात आल्या. 

का झाली: काळा पैसा आणि नकली नोटांची करन्सी बंद करण्यासाठी नोटा बंदीचा निर्णय घेतला. यापूर्वी 1978 मध्ये 1000 ची नोट बंद केली होती. नोटबंदीच्या वेळेस अर्थ मंत्रालयाचे सचिव शशिकांत दास यांनी सांगितले की, पाच वर्षात 500 च्या नोटांचे क्रमांकामध्ये 76 %  आणि 1000 च्या नोटांमध्ये 109 % ची वाढ झाली होती.

EXPERT VIEW : भारताचा उद्देश साध्य झाला नाही
- सेबीचे इन्व्हेस्टमेन्टचे सल्लागार जितेंद्र सोळंकी म्हणतात की, नोटबंदीचा उद्देश पूर्ण नाही झाला. रियल इस्टेट आणि टेररिझम फंडिंगला आळा बसला आहे. सरकारचा निष्कर्ष असा होता की, काळा पैसा आणि बनावट नोटांची करन्सीच्या स्वरूपात जमा झालेला पैसा बँकांमध्ये परत येईल, परंतु तसे झाले नाही.

3. VIP कोट्याला महत्व नाही
कसे झाले : 19 एप्रिल 2016 रोजी मोदी कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेतला गेला. 1 मे पासून देशभरात मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाड्यांवरचा लाल-निळे-पिवळे दिवे लावण्यावर सक्ती केली.

का केले: व्हीआयपी कल्चर बंद तडकाफडकी बंद करण्यात आले. अधिकारी आणि मंत्री याला खूप महत्त्व देत होते. यावर मोदी म्हणाले, या प्रतिकांना नवीन भारताच्या उद्देशांत महत्व नाही. प्रत्येक भारतीय हा एक विशेष व्यक्ती आहे. प्रत्येक भारतीय व्हीआयपी आहे. 28 वर्षांपूर्वीच्या सेंट्रल मोटार व्हेकल कायद्यानुसार, 1989 मध्ये बदल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. बदल करण्यासाठी सध्या सूचना देण्यात आल्या आहेत.

EXPERT VIEW : लाल-निळा-पिवळा दिव्याचा रुबाब दाखवणार नाही पुढारी..
राष्ट्रीय प्लॅनिंग कमिशनचे माजी सदस्य सोमपाल शास्त्री म्हणतात की, मोदी सरकारचा निर्णय योग्य आहे. नेते आणि अधिकारी लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्याकडून सेवेची अपेक्षा आहे. ते लाल-निळा-पिवळ्या दिव्यांचा रुबाब दाखवत असतील तर ते अयोग्य आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या... मोदी सरकारच्या तीन चूका... तीन आव्हाने आणि

> मोदी@3: 'मेरा भाषण ही मेरा शासन...'बाहुबली ते दंगल'पर्यंतचे 9 डायलॉग्समध्ये मोदींचा अंदाज
> मोदी@3: मोदी सरकारचे 3 पॉइंट अॅनालिसिस: 6 मुद्द्यांवरून जाणून घ्या कसा राहिला परफॉर्मन्स
> मोदी@3: मोदींना आवडते भेंडी-कढी आणि श्रीखंड, हे आहेत त्यांचे फेव्हरेट फूड
> मोदी@3: स्टाईल आयकॉन ते राष्ट्रवादी प्रतिमा..15 फॅक्ट्‍समधून समजून घ्या नरेंद्र मोदींचे व्यक्तिमत्त्व!
> मोदी@3: सोशल मीडियापासून ते ग्राऊंड रिपोर्टपर्यंत.. प्रत्येक पैलुचे विश्लेषण, पोस्टमॉर्टेम..
>मोदी@3: प्रत्येक मुद्द्यावर भरभरून बोलणारे मोदी..राम मंदिर, कत्तलखाने व दलितांच्या मुद्यांवर चिडीचूप
> मोदी@3: VIDEO: शपथ ते जाधव यांच्या फाशीवर स्थगिती, असे राहीले मोदी सरकारचे 3 वर्ष
बातम्या आणखी आहेत...