आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयटी कंपन्या सांगणार हिंदी योगदानाची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - मध्य प्रदेशात भोपाळ येथे १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत दहावे जागतिक हिंदी संमेलन होणार आहे. त्याची सध्या शहरात जोरदार तयारी सुरू आहे. या संमेलनात गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅप्पल सीडॅकसारख्या दिग्गज आयटी कंपन्या प्रदर्शन स्टॉल लावणार असून त्यातून त्यांनी हिंदीच्या विकासासाठी आतापर्यंत काय योगदान िदले भविष्यात काय करणार आहेत, याची माहिती देणार आहेत. त्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. आयटी कंपन्या या प्रदर्शनात हिंदी भाषेचा आयटी तंत्रज्ञानासाठी उपयोगा व्हावा म्हणून त्यांनी कसे बदल केले, हिंदी भाषेची त्यांनी किती काळजी घेतली, याची माहिती देणार आहेत. हे आयटी प्रदर्शन संमेलनाचे विशेष आकर्षण ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

संमेलनाचे उद््घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी होणार आहे. तर संमेलनाचा समारोप महानायक अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत होणार शनिवारी आहे. संमेलनात विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, ३५ खासदार, दोन राज्यांचे माजी मुख्यमंत्री त्याच बरोबर अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, किरण खेर, चित्रा मुद््गल, प्रसून जोशी सहभागी होणार आहेत. संमेलनात पाचशे विदेशी प्रतिनिधींसह ५००० लोक भाग घेणार आहेत.
दररोज चार सत्रे होणार अाहेत. त्यात मान्यवर वक्त्यांचा समावेश असेल.

सर्वात मोठे आकर्षण
मोदी : १० सप्टेंबर

कायम राष्ट्रभाषेला प्राधान्य देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हिंदीतील प्रभावी भाषण महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

बच्चन : १२ सप्टेंबर
हरिवंशराय बच्चन यांचे पुत्र महानायक अमिताभ बच्चन यांचे हिंदी संमेलनात प्रथमच भाषण होईल.

दिग्गजांचा सहभाग
संमेलनात राजकीय क्षेत्रात गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, गृहराज्यमंत्री डॉ. किरण रिजिजू, परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह, पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी, गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, माकपचे सीताराम येचुरी, शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत, भाजपच्या मीनाक्षी लेखी, शांता कुमार हे सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हिंदीचा इतिहास मांडणार
उज्जैन येथे २०१६ मध्ये सिंहस्थ कुंुभमेळा होणार आहे. त्यावर आधारित तसेच मध्य प्रदेशच्या विकासाची गाथा सांगणारे चित्र प्रदर्शन संमेलन स्थळी मांडले जाणार आहे. हिंदीतील साहित्यकृतींचा आढावा कालजयी साहित्याच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. त्यात मुन्शी प्रेमचंद यांच्या "गोदान'पासून हरिवंशराय बच्चन यांच्या "दशद्वार से सोपान'पर्यंत गाजलेल्या पुस्तकांचे मुखपृष्ठ संमेलन स्थळी लावले जाणार आहेत.