आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्तनाच्या कर्करोगाच्या ११ जनुकांचा शोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - आतडे, प्रोस्टेट आणि ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर हे उपचार उपलब्ध नसलेल्या कर्करोगांपैकी मानले जातात, परंतु आता या कर्करोगांवरही उपचार होण्याची शक्यता बळावली आहे. या घातक कर्करोगासाठी कारणीभूत असलेल्या ११ जनुकांचा वैज्ञानिकांनी शोध लावला आहे. त्यांच्यावर मात करू शकणारे पाच श्रेणींचे रेणूही संशोधकांनी शोधून काढले आहेत.
हे संशोधन भोपाळची आरजीपीव्ही आणि अमेरिकेच्या टोलेडो विद्यापीठाच्या २० वैज्ञानिकांनी केले आहे.दोन्ही विद्यापीठे आता या रेणूच्या अमेरिकी पेटंटसाठी दावा करण्याच्या तयारीत आहेत. आरजीपीव्हीने यापूर्वीसुद्धा कर्करोग रोधक दोन कणांचा शोध लावलेला आहे. रेणूंचा प्रभाव तपासून पाहण्यासाठी वैद्यकिय चाचणी घेतली जाईल.