आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सिमी’चा प्रमुख सफदर नागोरीसह 11 दहशतवाद्यांना जन्मठेप, 10 मिनिटांतच निकाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'सिमी’चा प्रमुख सफदर नागोरी - Divya Marathi
\'सिमी’चा प्रमुख सफदर नागोरी
इंदूर - स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सफदर नागोरीसह ११ दहशतवाद्यांना इंदूरच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश बलराज कुमार पालोदी यांनी सोमवारी बंद कक्षात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे  निकाल दिला. 
 
या दहशतवाद्यांच्या विरोधात हैदराबाद, मालेगाव बॉम्बस्फोटासह विविध खटले सुरू आहेत. पहिली शिक्षा आक्षेपार्ह सामुग्री ठेवणे, दहशतवाद्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे संचालित करणे आणि देशद्रोहाच्या आरोपासाठी सुनावण्यात आली. विशेष न्यायाधीश पालोदा यांनी काही दिवसांपूर्वी निकाल राखीव ठेवला होता.
 
सोमवारी दुपारी १२ वाजता न्यायाधीश पालोदा आपल्या कक्षात आले. त्यांनी अहमदाबादच्या तुरुंगात असलेला सफदर नागोरी, आमिल परवेज आणि इतरांना व्हिडिओ कॉन्फरन्सवर घेतले. १० मिनिटांच्या आत सर्वांना शिक्षा सुनावली. मुनरोज हा आरोपी इंदूरमध्येच होता. त्याला न्यायालयाने वैयक्तिक स्वरूपात शिक्षा सुनावून तुरुंगात पाठवले.
 
पोलिसांनी २७ मार्च २००८ रोजी पहाटे एका बेकरीतील दोन खोल्यांत दडून बसलेल्या या ११ दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून शस्त्रास्त्रे, बुरखे, काडतुसे आणि अवैध सामुग्री जप्त केली होती. सफदर नागोरी २००० मध्ये फरार झाला होता. त्याला २००८ मध्ये अटक झाली. देशात झालेल्या विविध बॉम्बस्फोटांशी त्याचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे संबंध होता. आमिल परवेझ हा अक्षरधाम हल्ल्यातही सहभागी होता.

यांना झाली जन्मठेप 
सफदर नागोरी, आमिल परवेझ, मोहम्मद कमरुद्दीन, कामराज हाजी, शिवली अब्दुल करीम, अहमद बेग, हाफिझ हुसैन, यासीम हमीद, मुनरोज कुतुबुद्दीन, सादुली करीम, अन्सार रज्जाक.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...