आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेशात देवी मंदिरातील दुर्घटनेत झालेल्या चेंगराचेंगरीत 113 ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दतिया (ग्वाल्हेर) - मध्य प्रदेशात दतिया येथील प्रसिद्ध रतनगडच्या माता मंदिराजवळ रविवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 113 भाविकांचा मृत्यू झाला. पोलिसांनी लाठीमार केल्याने तसेच सिंध नदीवरील पूल कोसळल्याची अफवा पसरल्याने भाविकांत गोंधळ उडाला. काही लोकांनी नदीत उड्या टाकून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात अनेकांचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नवमीनिमित्त रविवारी दतिया येथील माता मंदिरात दर्शनासाठी तसेच पारंपरिक धार्मिक सोहळ्यासाठी 1 लाखावर भाविक जमले होते. सकाळी साडेआठच्या सुमारास अचानक गोंधळास प्रारंभ झाला. माता मंदिराच्या आधी असलेल्या बसई घाटावरील सिंध पूल कोसळल्याची अफवा पसरली. पुलावर गर्दीचा रेटा वाढत जाऊन वाहतुकीची कोंडी वाढली. ती फोडण्यासाठी पोलिसांनी पुलाच्या दोन्ही बाजूंना लाठीमार केला. मात्र, लाठीमाराने गोंधळात अधिकच भर पडली. पुलाचा कठडा तुटला व काही लोक नदीत पडले. यानंतर पळापळ सुरू झाली. लहान मुले आणि महिला चेंगरल्या. काही लोकांनी घाबरून जीव वाचवण्यासाठी सरळ नदीत उड्या टाकल्या. नदीत पाणी बरेच असल्याने अनेकांचा बुडून मृत्यू झाला.