आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 12 Year Old Arpisha Sanghvi Mortification In Indore News In Marathi

नवरीसारखी नटलेल्या 12 वर्षीय \'स्कूल टॉपर\' अर्पिशाने स्विकारले वैराग्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- श्वेतांबर जैन समाजातील 12 वर्षीय दीक्षार्थी अर्पिशा संघवी हिने बुधवारी भौतिक सुखाचा त्याग करून वैराग्य ‍स्विकारले. अर्पिशा विघांजली इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आहे. ती नेहमी अभ्यासात टॉप राहिली आहे. दीक्षा घेतल्यानंतर अर्पिशाचे 'पंक्तिपूर्णा श्रीजी' असे नामकरण करण्‍यात आले आहे.
शहरातील कालानी नगरातील नवनिर्मित जिनालयात दीक्षा समारंभ पार पडला. आचार्य हेमचंद्रसागर सूरीश्वर महाराज, 19 साधू व 44 साध्विच्या उपस्थितीत अर्पिशाला दीक्षा घेतली.

दीक्षार्थीने अल्पवयातच नवकारसी सुरु केले होते. दोन वर्षांपासून ती नियमित कोमट पाणी सेवन करत होती. तसेच तिने अट्‌ठाई, नवपद वर्णची ओली सुरु केल्याचे श्री श्वेतांबर जैन मूर्तिपूजक श्रीसंघ कालानी नगराचे अध्यक्ष शांतिप्रिय डोसी आणि दिलीप भंडारी यांनी सांगितले. दीक्षार्थीने केशोपान करून सर्व विधी पूर्ण केल्या. तसेच कौटुंबिक जीवनाचा त्याग करून वैराग्य स्विकारले. यावेळी शेकडो भाविक उपस्थित होते.

अर्पिशाची निघाली भव्य मिरवणूक
वैराग्य स्विकारण्यापूर्वी अर्पिशाची भव्य मिरवणूक निघाली होती. शहरातून आपल्या मुलीची मिरवणूक काढण्यात यावी, अशी अर्पिशाच्या आईची इच्छा होती. अर्पिशासह तिचे आई-वडील रथावर विराजमान झाले होते. मिरवणुकीत अर्पिशाचे मित्र मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पुढील स्लाइड्स क्लिक करून पाहा, नवरीसारखी नटलेली अर्पिशाचे फोटो...