आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंदुरात १५ कोटींचे इस्कॉन मंदिर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - इंदूरमध्ये इस्कॉनचे नवे मंदिर तयार होणार आहे. निपाणियास्थित सध्या असलेल्या मंदिराच्या ठीक जवळच एक लाख स्क्वेअर फूटीवर हे मंदिर होईल. ते दोन वर्षांत तयार होईल. १५ कोटी रुपये खर्चून तयार होणार्‍या या मंदिराचे बांधकाम ऑक्टोबरमध्ये सुरू होईल.

मंदिरात राधा-गोविंद यांच्या मूर्तीशिवाय राम दरबार, चैतन्य महाप्रभूंजीच्या मूर्ती असतील. याचबरोबर प्रवचन हॉल, प्रसादम हॉल, संतांसाठी आराम कक्ष, विश्रामगृह, मंदिर व्यवस्थापनाची कार्यालये असतील. मंदिराचे अध्यक्ष महामनदास यांच्या माहितीनुसार नव्या मंदिराच्या निर्मितीनंतर वर्तमान मंदिरतून राधा-गोविंदाच्या मूळ मूर्ती नव्या मंदिरात हलवल्या जातील. तिथे जगन्नाथजींची मूर्ती स्थापित केल्या जाईल.

वंृदावनचे धर्तीवर मयूर पार्क
महामनदास यांनी सांगितले की, राज्यात अशा पद्धतीचे हे पहिलेच भव्य मंदिर असेल. जे ओंकारेश्वर-महाकालेश्वरसारख्या दोन पवित्र ज्योतिर्लिंगांना जोडणार्‍या मार्गावर भक्तांसाठी एक आकर्षणाचे प्रमुख केंद्र असेल.