आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: 175 वर्षे जुन्‍या मंदिराच्‍या खोदकामात उजेडात आले राजांचे एक रहस्‍य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोपाळ मंदिरापासून राजवाड्यापर्यंत रहस्‍यमयी गुहा आढळली आहे. इन्‍सेटमध्‍ये गुहा. - Divya Marathi
गोपाळ मंदिरापासून राजवाड्यापर्यंत रहस्‍यमयी गुहा आढळली आहे. इन्‍सेटमध्‍ये गुहा.
इंदौर- होळकर राजवंशाने बनवलेल्‍या 175 वर्षे जुन्‍या गोपाळ मंदिराच्‍या खोदकामात अनेक रहस्‍य उजेडात येत आहेत.  मंदिराच्‍या जीर्णोध्‍दरासाठी चालु असलेल्‍या खोदकामादरम्‍यान दगडांनी बनलेली एक गुहा सापडली आहे. चुना आणि दगडांनी बनलेली 12 फुट उंच ही गुहा रस्‍त्‍याच्‍या दुस-या बाजुला असलेल्‍या राजांच्‍या राजवाड्यात निघत आहे. संकटकाळी सुरक्षित बाहेर येण्‍यासाठी या गुहांचा वापर केला जात असावा, अशी शक्‍यता तज्ञांनी व्‍यक्‍त केली आहे. 
 
- राजबाडा परिसरातील गोपाळ मंदिराची निर्मिती 1832मध्‍ये कृष्‍णाबाई होळकर यांनी केली होती. त्‍या भगवान कृष्‍णाच्‍या भक्‍त होत्‍या. मराठा वास्‍तुकलेनुसार बनलेल्‍या 58 हजार स्‍क्‍वेअर फुट आकरमानाच्‍या या मंदिरासाठी त्‍या काळी 80 हजार रुपयांचा खर्च आला होता. मंदिरासमोरच होळकर राजांचा राजवाडा आहे.

- स्‍मार्ट सिटी प्रोजेक्‍ट अंतर्गत येथील प्रशासनाने मंदिराच्‍या सौंदर्यीकरणाची योजना बनविली आहे. यासाठी मंदिरातील दोन ठिकाणी खोदकाम चालु आहे. त्‍यापैकी एका ठिकाणी खोदकाम करताना कामगारांना दगडांची भिंत आढळली. त्‍यांनी ताबडतोब याची माहिती खोदकाम करणा-या कंपनीचे सुपरवाइझर लखन सिंह यांना दिली. त्‍यांनी कामगारांना भिंतीला धक्‍का न लावता खोदकाम करण्‍याचे सांगितले. कामगारांनी खोदकाम सुरु केले. नंतर 10 फुट जमिन खोदल्‍यानंतर त्‍यांना एक रहस्‍मयी गुहा समोर दिसली. 
 
- ही गुहा दोन्‍ही बाजुंनी दगड आणि चुन्‍याने बनविली होती. यांची रुंदी 7 फुट आणि उंची 12 फुट एवढी होती. सुरुंग अजुनही एवढी मजबुत आहे की, तज्ञांच्‍याअनुसार या गुहेला एखाद्या विशेष कारणासाठी बनविण्‍यात आले असावे. या मंदिराच्‍या समोरच राजवाडा आहे. म्‍हणून तज्ञांचा असा अंदाज आहे की, या गुहेचा राजवाड्याशी नक्‍कीच जवळचा संबंध असला पाहिजे. ज्‍यांच्‍या अनेक पिढ्यांनी मंदिरात पुजेचे काम केले आहे आणि सध्‍या या मंदिरात पुजेचे काम करणा-या लता अरुण यांनी सांगितले की, या गुहेची निर्मिती मंदिरच्‍या निर्मितीसोबतच करण्‍यात आली आहे. त्‍यांच्‍याअनुसार गुहेचा एक भाग राजवाड्यातील दरबारामधील एका गुप्‍त कक्षेत जातो. 
 
- सध्‍या पुरातत्‍व विभाग या गुहेबद्दल आणखी तपास करत आहे त्‍यामुळे लवकरच या गुहेचे रहस्‍य समोर येणार आहे. 

पुढील स्‍लाइडवर पाहा, या रहस्‍यमयी गुहेचे फोटोज... 
 
बातम्या आणखी आहेत...