आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॉकलेट फॅक्टरीत युवतीवर बलात्कार; आईच्या जागेवर मिळाली होती नोकरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- एका चॉकलेट फॅक्टरीत 18 वर्षीय युवतीवर सामुहीक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फॅक्टरीतील तीन कर्मचार्‍यांनी हे कुकर्म केले आहे. एक कर्मचारी पीडितेवर अत्याचार करत असताना इतर दोघांनी पाहिले. पीडितेला मदत करण्याचे सोडून दोघांनीही तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बजरंग कांकडमधील गोशाला चॉकलेट फॅक्टरीत ही घटना घडली. पीडीत दोन महिन्यांपासून या फॅक्टरीत काम करते. तिच्या आईच्या जागेवर ती नोकरी करत आहे.

फॅक्टरीच्या मालकांनी पीडितेला वरच्या मजल्यावरील खोलीची फरशी पुसायला सांगितले. पीडिती वरच्या मजल्यावर गेल्याचे पाहून नराधम राधेश्याम तिच्या मागे गेला. त्याने पीडितेला धमकावत तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. राधेश्यामला पीडितेवर अत्याचार करताना इतर दोन कर्मचार्‍यांनी (राजकुमार व संतोष) पहिले. दोघांनी पीडितेची मदत न करता तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नव्हे तर तिला जिवे ठार मारण्याची धमकीही दिली.

पीडितेने मोठी हिंमत करत फॅक्टरीतील इतर महिला कर्मचार्‍यांना आपबिती सांगितली. युवतीच्या आईला या घटनेची माहिती मिळताच तिने पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केले आहे.
बातम्या आणखी आहेत...