आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्ल्स होस्टेलमध्ये 2 तरुणींनी केले लज्जास्पद काम, चेकिंग झाल्यावर हे आले समोर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्यापीठाच्या गर्ल्स होस्टेलमध्ये 2 मुलींना दारू आणि सिगारेट पिताना रंगेहाथ पकडण्यात आले. - Divya Marathi
विद्यापीठाच्या गर्ल्स होस्टेलमध्ये 2 मुलींना दारू आणि सिगारेट पिताना रंगेहाथ पकडण्यात आले.
इंदूर - देवी अहिल्या विद्यापीठाच्या मुलींच्या होस्टेलमध्ये मुलींनी नशाखोरी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. मंगळवारी रात्री उशिरा वॉर्डनने अचानक चेकिंग केली असता एका रुममध्ये दोन मुली मद्यपान करताना आणि सिगारेट ओढताना रंगेहाथ पकडण्यात आल्या. प्रकरणाच्या तपासासाठी एक समिती बनवण्यात आली आहे. कमिटीचा तपास अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर शिस्तभंग आणि निलंबनाची कारवाईही होऊ शकते. तथापि, त्या वेळी या 2 मुलींसोबत इतर विद्यार्थिनीही खोलीत होत्या, पण सगळ्यांवर कारवाई होईल का, हे अद्याप स्पष्ट नाही.
 
वॉर्डनने केली अचानक तपासणी
वास्तविक, मागच्या काही दिवसांपासून होस्टेलमध्ये राहणाऱ्या काही इतर विद्यार्थिनींकडून सातत्याने तक्रारी येऊ लागल्या होत्या. तक्रारी म्हटले होते की, न्यू सी. व्ही. रमण होस्टेलमध्ये काही विद्यार्थिनी रात्री दारू पितात. तर काही विद्यार्थिनींकडून सिगारेट ओढत असल्याची तक्रार आली होती. याप्रकरणी सुरुवातीला होस्टेल प्रशासनाने लक्ष दिले नाही, पण बहुतांश मुलींनी विरोध प्रकट केला तेव्हा वॉर्डनने मंगळवारी रात्री अचानक तपासणी केली. यादरम्यान एका रूममध्ये दोन मुली दारू आणि सिगारेट पिताना आढळल्या. 
- सध्या एकाही मुलीवर कारवाई झालेली नाही. याप्रकरणी समितीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. 
 
समितीच्या अहवालाच्या आधारे होईल कारवाई
- चीफ वॉर्डन डॉ. शक्ती बॅनर्जी म्हणाल्या की, अजून कमिटीने प्रकरणाचा तपास पूर्ण केलेला नाही. पूर्ण तपासानंतरच काय कारवाई करायची ते निश्चित होईल.
बातम्या आणखी आहेत...