आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5000 ची मोपेड विकली 1 लाखात, 500 किमी अंतरावरून आला खरेदीदार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर - 20 वर्षांआधी फलित गोयलच्या वडिलांनी मोफा मोपेड खरेदी केली होती. फक्त 5 हजार रुपयांच्या या मोपेडचे फलितने व्यवस्थित जतन केले. तीन महिन्यांआधी त्याने फेसबुकवर चॅट करत या मोपेडला विकण्याची ऑफरला यूपीच्या योगेश अग्रवाल यांनी दिली होती. पहिल्यांदा फलितला विश्वासच बसला नाही, परंतु फोनवर बोलणे झाल्यावर त्यांनी योगेशला ही मोपेड दिली. योगेश यूपीच्या सहारनपूरहून मोपेड खरेदीसाठी तब्बल 500 किमी अंतराचा प्रवास करून ग्वाल्हेरला आले होते.
 
SUV मध्ये ठेवून नेली मोपेड...
- सिटी सेंटरमध्ये राहणाऱ्या फलित गोयलने त्यांचे वडील सुनील गोयल यांनी 20 वर्षेआधी खरेदी केलेली मोपेड व्यवस्थित जतन करून ठेवली होती. वडिलांचे निधन झाल्यानंतर फलितने या मोपेडला कॉलेजात जाण्यासाठी वापरू लागले.
- वजनाने हलकी असलेल्या या मोपेडचे जतन फलतने खूप चांगल्या रीतीने केले आहे. अशा पद्धतीच्या मोपेड आजकाल सहसा कुठेच दिसत नाहीत. 
 
फेसबुकहून आली ऑफर
- तीन महिन्यांआधी फलितने फेसबुकवर मित्रांशी चॅटिंग करताना या मोपेडचा उल्लेख केला. त्या दरम्यान यूपीच्या योगेश अग्रवालने त्यांना ती खरेदी करण्याची ऑफर दिली. आधी तर फलितला विश्वास बसला नाही, पण फोनवर जेव्हा प्रत्यक्ष बोलणे झाले त्याने विकण्याचा निर्णय घेतला. यासाठी तब्बल 1 लाख रुपयांचा सौदा ठरला.
- खरेदीदार योगेश म्हणाला की, त्याला दुर्मिळ वस्तू संग्रही ठेवण्याचा छंद आहे. आणि या कलेक्शनसाठीच मी मोपेड विकत घेण्याचा निर्णय घेतला. 
 
पुढच्या स्लाइडमध्ये पाह, आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...