आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खजुराहोमध्‍ये आहे या यंग योग गुरूचा आश्रम, 28 देशातील लोकांना शिकवले आसनं

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- इंदूरमध्‍ये राहणारे धर्मेंद्र मागील चार वर्षांपासून खजुराहोच्‍या योग आश्रमात मुख्‍य योग प्रशिक्षक आहेत. त्‍याचे वय अवघे 26 वर्ष असले तरी, त्‍यांचे शिष्‍य जर्मनीपासून फ्रांस, चीन, रशिया अशा सुमारे 28 देशांमध्‍ये आहेत. यामध्‍ये काही डॉक्‍टर, इंजिनियर, प्राध्‍यापक, बिझनेसमन, राजकीय पुढारीही आहेत.
आंतरराष्‍ट्रीय योग दिवसानिमित्‍त आम्‍ही आपल्‍याला योगी माधव या नावाने प्रसिद्ध असलेल्‍या धर्मेंन्द्र जाखड यांच्‍याविषयी माहिती देत आहोत. धर्मेंन्द्र हे कोणी संत किंवा प्रवचनकार नाहीत. ते योग प्रशिक्षक आहेत.

एवढ्या कमी वयात त्‍यांनी 600 हून अधिक विदेशी लोकांना योगाचे धडे दिले आहेत. मागील 4 वर्षांपासून धर्मेंन्द्र या आश्रमाचे प्रमुख शिक्षक आहेत आहेत. धर्मेंद्र यांच्‍याकडून प्रशिक्षण घेतल्‍यानंतर लोक आपआपल्‍या देशात ट्रेनिंग सेंटरच्‍या माध्‍यमातून योगाचा प्रचार करत आहेत.

विदेशी युवतींनाही आवड..
धर्मेंन्द्र सांगतात की, खजुराहोच्‍या आश्रमात दरवर्षी सुमारे चार ट्रेनिंग कोर्स होतात. प्रत्‍येक बॅचमध्ये 40 ते 50 जण सहभागी होतात. विशेष म्‍हणजे या वर्गांमध्‍ये 80 ते 90 टक्‍के प्रमाण हे युवतींचे असते. ते सांगतात की, युरोपात सर्वांधिक योग केंद्र महिला चालवतात. त्‍यांच्‍याकडून प्रशिक्षण घेतलेल्‍या सुमारे 300 महिला यूरोपात योग शिकवतात.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, काही योग क्रिया..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...