आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोटे बोलणाऱ्या भाजप खासदाराला तीन हजारांचा दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने उज्जैन येथील भाजपचे खासदार डॉ. चिंतामणी मालवीय यांना खोटे बोलल्याप्रकरणी ३००० रुपयांचा दंड ठोठावला असून ही रक्कम दहा दिवसांत भरण्याचे आदेश दिले आहेत. मतदारसंघातील माजी खासदार प्रेमचंद गुड्डू यांनी मालवीय यांच्या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
याप्रकरणी न्यायालयाने त्यांना ३१ जुलै रोजी नोटीस बजावली होती. तेव्हापासून १२ वेळा सुनावणी झाली. दरवेळी न्यायालयाने बोलावूनदेखील ते हजर झाले नाहीत. आता शपथपत्र दाखल करून आपल्याला नोटीस मिळाली नव्हती. ती नोकराने रिसिव्ह केली होती.
लोकसभेच्या अधिवेशनात व्यग्र होतो आदी कारणे दिली. नोकराने नोटिशीची कल्पना आपल्याला दिली नाही. तो विसरून गेला. मला माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितले. खासदार खोटे बोलत असल्याचा आक्षेप प्रेमचंद यांनी घेतला. त्यांनी यासंदर्भात केलेले युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरले. त्यांच्या वकिलाने म्हटले की, नोटीस नोकराला मिळाली होती तर त्याचे शपथपत्र कुठे आहे? खासदार मालवीय दिल्लीला गेले होते, तर त्याची येण्या-जाण्याची तिकिटे कुठे आहेत? संसदेतील हजेरीचे रेकॉर्डही त्यांनी दिलेले नाही.
यावरून ते खोटे बोलत आहेत हे सिद्ध होते. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना ३००० रुपये दंड ठोठावला. निवडीला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावण्याची खासदारांची मागणीही न्यायालयाने फेटाळून लावत तपासासाठी हे प्रकरण रजिस्ट्रारकडे सोपवले.