आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या 3 कारणे; मग तुम्हीही म्हणाल, Chinese फटाके नको रे बाबा !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - चीनचा माल फार स्वस्त मिळतो, मात्र गँरटी विचारली की विक्रेत्याच्या चेहऱ्यावर मोठे प्रश्नचिन्ह. सहाजिक आहे फटाक्यांची खरेदी आली की सर्वात पहिला उपाय म्हणजे चीनी वस्तूंपासून चारहात लांब राहाणे. दिवाळीत चायनीज फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतरही अधिक नफा मिळवण्याच्या उद्देशाने दुकानदार चोरून-लपून माल घेऊन येत आहेत आणि ग्राहक देखील त्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत, असे चित्र बाजारात पाहायला मिळत आहे. भारतीय बनावटीचे फटाके महागडे आहेत आणि प्रशासनाच्या नियमानूसार त्यांच्या आवाजावर मर्यादा आहेत. मात्र त्यांचा आपल्या आयुष्यावर फार काही विपरीत परिणाम होत नाही.

फटाके विक्रेत्यांच्या माहितीनूसार चायनीज फटाके दिल्ली- मुंबईतून रस्ते मार्गाने देशभरात जातात. चायनीज फटाक्यांमधील पोटॅशियम क्लोरेटच्या वापरामुळे अस्थमाचा धोका आहे. तर त्यांच्या आवाजाने कानांचे पडदे फाटण्याची भीती आहे. एवढेच नाही तर चायनीज फटाके ठेवल्या-ठेवल्याही फुटू शकतात.

चल तर जाणून घेऊ या, अशी तीन कारणे ज्यामुळे तुम्ही देखिल चायनीज फटक्यांना नाही म्हणाल...
बातम्या आणखी आहेत...