आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 वर्षीय विवाहित तरुणीवर 4 जणांचा गँगरेप; म्हणाली- तक्रार देणार नाही, सांगितले हे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
18 वर्षीय तरुणीवर 4 जणांनी गँगरेप केला. - Divya Marathi
18 वर्षीय तरुणीवर 4 जणांनी गँगरेप केला.

इंदूर - उपचारांसाठी तीन हजार रुपये देण्याच्या बहाण्याने एका ओळखीच्या व्यक्तीने झाबुआमधून 18 वर्षीय तरुणीला कारने इंदूरला आणले. तिला विजयनगरच्या एका फ्लॅटमध्ये नेले. तेथे त्याचे आणखी 3 साथीदार होते. तरुणीला त्यांनी बळजबरी दारू पाजली आणि चौघांनी तिच्यावर गँगरेप केला. यानंतर रात्री साडे 10 वाजता तिला गंगवाल बसस्टँडवर सोडून पळून गेले. तेथे तरुणीला रडताना पाहून लोकांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी तरुणीला स्टेशनमध्ये नेले. तिने पोलिसांना गँगरेपची हकिगत सांगितली. पण केस दाखल करायला नकार दिला, म्हणाली- पती आणि घरचे तिला हाकलून देतील.

 

असे आहे प्रकरण...
- पोलिस अधिकारी म्हणाले, तरुणीला उपचारांसाठी पैशांची आवश्यकता होती. तिने आपल्या परिचिताला फोन करून मदत मागितली. तो मित्राकडून मदत मिळवून देतो असे म्हणाला. मित्राने महिलेला कॉल केला आणि इंदूर आल्यावर पैसे देतो असे म्हणाला. यामुळे ती परिचितासह कारने इंदूरला गेली. गँगरेपनंतर तिला बसस्टँडवर सोडून नराधम पळून गेले. लोकांनी तिला रडताना पाहिल्याने पोलिसांना माहिती दिली. यानंतर तिला पोलिसांनी ठाण्यात आणले. चौकशीत तरुणीने घटनेचा खुलासा केला.

 

पोलिसांनी समुपदेशन केले तरीही तरुणीने तक्रारीला दिला नकार

- माहिती मिळाल्यावर सीएसपी, एसएसपीसहित महिला पोलिस अधिकारीही पोहोचले. तिला तक्रार नोंदवायला सांगितले तर तिने नकार दिला. सूत्रांनुसार, तरुणीने 17 वर्षे वयात लव्ह मॅरेज केले होते. महिलांनी पोलिसांनी तरुणीचे समुपदेशन केले आणि आरोपींची नावे विचारली. परंतु तिने नकार दिला. ती म्हणाली की, याची माहिती पती आणि घरच्यांना कळली तर ते मला घराबाहेर काढून देतील. ती असेही म्हणाली की, केस दाखल करण्याची जबरदस्ती केली तर मी जीव देईन. पोलिस मेडिकल करण्यासाठी तिला एमवाय रुग्णालयात घेऊन गेले, परंतु तिने मेडिकल चेकअप करू दिले नाही.

 

काय होऊ शकते या प्रकरणात?

अधिवक्ता आनंद अग्रवाल म्हणाले, अशा प्रकरणांत हायकोर्ट वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीचा आधार घेऊनच जनहीत याचिका दाखल करू शकते आणि पोलिसांना थेट एफआयआर दाखल करण्यास सांगू शकते. सत्र न्यायालय मात्र चालान सादर झाल्यावरच हस्तक्षेप करते.

मेडिकल करण्यास दिला नकार

 

काय म्हणाले पोलिस?
- आम्ही तरुणीचे समुपदेशनही केले, परंतु तिने रिपोर्ट लिहायला नकार दिला. ती म्हणू लागली की, तुम्ही जर बळजबरी तक्रार नोंदवायला लावली तर मी जीव देईन. तिला मेडिकलसाठी पाठवले, परंतु तिने त्यालाही नकार दिला.
- हरिनारायणचारी मिश्र, डीआयजी.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...