आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 40 Thousand Photos Come Within 15 Days For The Bhaskar Group Photography

भास्कर समूहाच्या छायाचित्र स्पर्धेत 15 दिवसांत 40 हजार फोटो सहभागी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - दैनिक भास्कर समूहाने आयोजित केलेली छायाचित्र स्पर्धा ‘फोटोमॅनिया’मध्ये हजारो प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. केवळ 15 दिवसांमध्ये 43 हजार प्रवेशिका मिळाल्या आहेत. सोशल मीडियावरही याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. स्पर्धेत 20 जुलैपर्यंत सहभागी होता येणार आहे.


फोटोमॅनियाचे वैशिष्ट्य म्हणजे छायाचित्रकलेची आवड असणारी कोणतीही व्यक्ती यात सहभागी होऊ शकेल. स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्काराबरोबर प्रसिद्धीही मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. छायाचित्र स्पर्धा तीन श्रेणीत होत आहे. यामध्ये हॅपिनेस, नेचर आणि अमेझिंग इंडिया हे विषय देण्यात आले आहेत. शहर, राज्य व राष्‍ट्रीय पातळीवर विजेत्यांची निवड केली जाईल. देशातील प्रसिद्ध छायाचित्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि दैनिक भास्कर समूहातील संपादकांची समिती विजेत्यांची निवड करेल. छायाचित्र कलेला प्रोत्साहन देणे व नव्या छायाचित्रकारांची प्रतिभा समोर यावी हा फोटोमॅनियामागचा उद्देश आहे. प्रवेशिकेसाठी व्यावसायिक कॅमे-यातून काढलेले छायाचित्र पाठवणे आवश्यक नाही. याचाच अर्थ कोणताही कॅमेरा किंवा मोबाइलने काढलेले छायाचित्र तुम्ही पाठवू शकता.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी Dainikbhaskar.com/fotomania, Divyabhaskar.com/fotomania किंवा Divyamarathi.com/fotomania वर लॉगऑन करू शकता.