आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाच माझ्या मुलाचा बाप, 45 वर्षीय महिलेने केले 14 वर्षाच्या मुलावर आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहडोल- मध्य प्रदेशात एका 45 वर्षीय महिलेने 14 वर्षीय अल्पवयीन मुलावर गंभीर आरोप केले आहेत. मुलापासून आपल्याला अपत्य झाले असल्याचा गौप्यस्फोट या महिलेने केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहडोलमधील गोहपारू या गावातील ही घटना आहे.

असे आहे हे प्रकरण-
पोलिसांनी सांगितले की, एका आदिवासी मुलावर एका महिलेने आरोप केले आहेत. मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मात्र, मुलाने महिलेचे सर्व आरोप फेटाळले आहेत. महिलाच आपल्याला अनेक दिवसांपासून मानसिक त्रास देत असल्याचा आरोप मुलाने केला आहे. मुलगा नवव्या इयत्तेत शिकतो. मागील काही महिन्यांपासून महिला आपल्याला शारिरीक संबंध ठेवण्‍यासाठी बळजबरी करत होती. या महिलेला आपण ओळखत असलो तरी हिच्यासोबत आपले कुठलेही शारिरिक संबंध ठेवले नाही. तसेच महिला गरोदर कशी राहिली याविषयी आपल्याला माहीत नसल्याचे मुलाने पोलिसांना सांगितले आहे. म‍हिला गावात आपली बदनामी करत आहे.
गाव पंचायतमध्येही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मात्र, त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहेत.