आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Girls Drunk Pub Party Car Fell 5 Girls Indore Drunk And Drive Police Parents Girls Wine Short Clothes

पार्टीत धुंद होऊन घरी परतत होत्या कॉलेज गर्ल, 10 फूट खोल नाल्यात कोसळली कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर (मध्यप्रदेश) - पबमध्ये पार्टी करुन मध्यरात्रीनंतर घरी परतत असलेल्या मुलींची नशा तेव्हा उतरली जेव्हा त्यांची कार एका नाल्यात पडली. ही घटना बुधवारी उशिरा रात्रीची आहे. खजराना पोलिस स्टेशनच्या हद्दीतील महालक्ष्मीनगर येथील एका नाल्यातून मोठा आवाज झाल्यानंतर लोकांनी काय झाले हे पाहाण्यासाठी गर्दी केली. कार नाल्यात पडल्याने मोठा आवाज झाला होता. नागरिकांनी तत्परता दाखवत कारमध्ये अडकलेल्या मुलींना बाहेर काढले.
- मुलींनी लेट नाइट पार्टीज् मध्ये ड्रिंक करुन रस्त्यावर धुमाकूळ घालणे, हे आता इंदूरवासियांना सवयीचे झाले आहे.

- बुधवारी रात्री महालक्ष्मीनगर येथील रस्त्यावर नव्हे तर चक्क नाल्यात झिंगलेल्या मुली पडल्या.
- रात्री साधारण 1 वाजता लोकांनी एक कार नाल्यात पडताना पाहिली. त्याआधी रस्त्यावर नागमोडी वळेणे घेत ही कार चालली होती. क्षणात ती रस्त्यावरुन गायब झाली.
- लोक नाल्याच्या दिशेने धावत पळत गेले. पाहातात तर ड्रायव्हिंग सीटवर एक मुलगी आणि तिच्यासोबत आणखी 4 मुली होत्या.
- लोकांनी कसे तरी करुन त्यांना बाहेर काढले. पाचही मुलींनी एवढी दारू प्याली होती की त्यांना धड उभे राहाता येत नव्हते.
- त्यानंतर नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांच्या पथकाने मुलींना रस्त्यावरच खडसावले.
- त्यांच्या नातेवाईकांना बोलावून मुलींना त्यांच्या हवाली करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...