आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

याआधी पाहिली नसेल अशी साडी, जिथे जाईल तिथे खिळून राहातात लोकांच्या नजरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - 500 आणि 1000 रुपयांची नोट बंद होऊन दोन आठवडे होत आले, अजूनही बँक आणि एटीएम बाहेरील रांगा कमी झालेल्या नाहीत. नागरिकांना नोटबंदीचा त्रास होत असला तरी त्यातही लोकांनी व्यंग आणि हास्य शोधण्याचा प्रयत्न केला आहे. काहींनी या जुन्या नोटांच्या आठवणी जपून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. असेच एक उदाहरण इंदूरमध्ये पाहायला मिळाले. येथील एका महिलेने बंद झालेल्या 500-1000 रुपायांची प्रिंट असलेली साडी परिधान केली होती.
- बिर्लाग्राम येथील रहिवासी वंशिका चौधरी जेव्हा बाजारातून जात होत्या, तेव्हा प्रत्येकांच्या नजरा त्यांच्याकडे वळत होत्या.
- वंशिका यांना 500-1000 रुपयांची नोट प्रिंटेड असलेली साडी परिधान केली होती. त्यांची साडी पाहून लोकांच्या या नोटेसंबंधीच्या आठवणी जागृत झाल्या.
- वंशिका या बुटिक संचालिका आहेत. नोटबंदी होण्यापूर्वी त्यांनी ही साडी उज्जैन येथून खरेदी केली होती.
- 500-1000 ची नोट चलनातून बंद झाल्यानंतर ही साडी त्यांना अधिक प्रिय वाटायला लागली. त्याबद्दल वंशिका सांगतात,
'500- 1000 च्या नोटाबंद झाल्या. उद्या मोबाइलमधूनही त्यांचे फोटो डिलिट होतील. मात्र नोटांची प्रिंट असलेली ही साडी मी जपून ठेवणार आहे. जेव्हा या नोटांची आठवण होईल तेव्हा मी ही साडी नेसेल.'
पुढील स्लाइडमध्ये पाहा, फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...