आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटविसर्जनाला जाणार्‍या भाविकांवर काळाचा घाला; भरधाव ट्रकने 21 जणांना चिरडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ/सिवनी- मध्यप्रदेशातील लखनादौन येथे भरधाव ट्रकने घटविसर्जनाला जाणार्‍या 21 भाविकांना चिरडल्याची घटना घडली आहे. दुर्घटनेत 7 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 14 जण गंभीर जखमी झाले आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

लखनादौनपासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या जोबा गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे. जखमींना जबलपूर मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

लखनादौनचे टीआय शिवराज सिंह यांनी सांगितले की, नरसिंहपुर फोरलेन महामार्गावरील बंजारी माता मंदिरासमोर ही दुर्घटना घडली. सर्व भाविक घट विसर्जनासाठी निघाले होते. त्याचवेळी समोरुन येणार्‍या भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले.

पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित घटनेचेे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...