आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

65 वर्षीय व्यक्तीचा झाला विवाह, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पळाली नवरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैन- पत्नीच्या मृत्यूनंतर 65 वर्षीय पुरुषाने लग्न करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याप्रमाणे लग्नही केले. पण घरी आलेल्या नवविवाहितेने या वृद्ध नवरदेवाला चांगलेच लुटले. 55 हजार रुपयांनी फसवून घरातून पळ काढला. या प्रकरणी नगरदेवाने पोलिस तक्रार दाखल केली आहे.
या वृद्ध नवरदेवाचे नाव गोपाळ माली असे आहे. त्यांचे लग्न मनीबाई ऊर्फ मनोरमा या 45 वर्षीय महिलेसोबत झाले होते. यासाठी कय्युम आणि इजरायली या दोघांनी मध्यस्थी केली होती. त्यांनी यासाठी गोपाळ यांच्याकडून 55 हजार रुपये घेतले होते. पण लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच मनाबाईने घरुन पळ काढला.
याची माहिती मिळाल्यावर गोपाळने कय्युम आणि इजरायली यांना जाब विचारला. त्यांनी गोपाळला आणखी 10 हजार रुपये देण्यास सांगितले. त्याप्रमाणे गोपाळने पैसे दिले. पण तरीही मनीबाई घरी आली नाही. त्यामुळे गोपाळने फसवणुकीची पोलिस तक्रार दाखल केली आहे.
पुढील स्लाईडवर बघा, पोलिस आयुक्त एम. एस. वर्गा यांच्याकडे तक्रार दाखल करताना गोपाळ माली...